इचलकरंजी : केमिकल फॅक्टरीला भीषण आग | पुढारी

इचलकरंजी : केमिकल फॅक्टरीला भीषण आग

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी पासून जवळ असलेल्या तारदाळ येथील आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली आहे. स्फोट झाल्याने आगीचे रौद्ररुप धारण केले आहे. फॅक्टरीला आग लागल्यामुळे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहे. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी नसल्याचे वृत्त आहे.

ही आग मोठी असून सगळीकडे धुराचे लोट पसरले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Back to top button