नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील ‘बर्ड रिगिंग’वर यंदाही कोरोनाचे सावट ; प्रक्रिया लांबणीवर | पुढारी

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील ‘बर्ड रिगिंग’वर यंदाही कोरोनाचे सावट ; प्रक्रिया लांबणीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांमध्ये आधी कोरोना त्यापाठोपाठ आलेल्या बर्ड फ्लूमुळे रखडलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील ‘बर्ड रिगिंग’वर यंदाही ओमायक्रॉनच्या रूपाने पुन्हा कोरोनाचे सावट आहे. ‘बर्ड रिगिंग’ची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, सध्या पर्यटनस्थळे बंद असल्याने ‘बर्ड रिगिंग’ची प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख असलेल्या नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यात देश-विदेशातील 265 प्रजातींच्या पक्ष्यांचे आगमन होत असते. पाच महिन्यांच्या पाहुणचारानंतर हे पाहुणे मायदेशी परतात. पक्ष्यांच्या हवाई उड्डाणमार्गाचा नकाशा तयार करण्यासह पर्यटनवृद्धीसाठी तसेच संशोधनासाठी ‘बर्ड रिगिंग’चा निर्णय नाशिक वन्य जीव विभागाने घेतला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला सन 2020 मध्ये मंजुरी मिळाली होती. तोपर्यंत त्यावर्षीचा पक्षी हंगामा संपला, तर 2021 मध्ये बर्ड फ्लूमुळे रिगिंगचा मुहूर्त हुकला होता.

यंदाही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी अर्थात बीएनएचएसच्या मदतीने जानेवारी 2022 मध्ये ‘बर्ड रिगिंग’चे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात वनकर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अभयारण्ये बंद करण्यात आल्याने ‘बर्ड रिगिंग’ला विलंब होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, पाणथळ, गवताळ अधिवासाचे महत्त्व, पक्षी निरीक्षण, पक्षी ओळख, प्रगणना, माळरानातील पक्षीजीवन आदींचे मार्गदर्शन करण्यात आले होते. मात्र, शासन नियमामुळे तयारी वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिक : सेवानिवृत्तांची एसटीकडे पाठ ; 25 पैकी अवघे तिघे कामावर रुजू

वन्य जीव विभागाने ‘बर्ड रिगिंग’ची तयारी पूर्ण झाली असून, वनकर्मचार्‍यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून ‘बर्ड रिंगिंग’ प्रक्रियेची उजळणी देण्यात आली आहे. बीएनएचएसच्या वेळापत्रकानुसार रिंगिंगची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या वेळापत्रकात काही बदल संभवतो.
-शेखर देवकर, वनक्षेत्रपाल,
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

हेही वाचा :

Back to top button