Malti Chahar Casting Couch: क्रिकेटर दीपक चाहरची बहीण मालती चाहर ही नुकतीच बीग बॉस १९ च्या हंगामात दिसून आली. मालती चाहरने अनिल शर्मा यांच्या जीनियस फिल्ममधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मालतीने नुकतेच चित्रपट सृष्टीतील कास्टिंग काऊचबाबत मोठे अन् धक्कादायक खुलासे केले. तिने एका दिग्दर्शकानं आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा दावा केला आहे. तो दिग्दर्शक हा माझ्या वडिलांच्या वयाचा होता. त्याने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा मालती चाहरने केला आहे.
मालतीनं सांगितलं की दिग्दर्शकासोबतच्या या घटनेनंतर तिला खूप दुःख झालं होतं. मालती ज्यावेळी इंडस्ट्रीमध्ये नवी होती त्यावेळी हा सगळा प्रकार घडला. ती आपल्या कारकीर्दिची नुकतीच सुरूवात करत होती.
मालतीने सिद्धार्थ कनन सोबतच्या मुलाखतीवेळी हा गौप्यस्फोट केला. ती म्हणाली की इंडस्ट्रीमध्ये कोणी तुमचं नसतं.
मालती पुढे म्हणाली, 'मी माझ्या वडिलांना देखील सांगितलं की एक दोनवेळा लोकांनी चान्स देखील मारला असेल. मात्र कोणी मर्यादेच्या बाहेर गेलं नाही. इथले लोक खूप स्मार्ट आहेत. ते तुमचा स्वभाव ओळखतात. एका दोघांनी चर्चा केली. एकाने तर असभ्य वर्तन देखील केलं. मात्र बाकीचे लोक हुशार निघाले. ते आपल्या बॉडी लँग्वेजवरून समजून जातात. मी ज्या पार्श्वभूमीतून येते ते माझ्या बोलण्यातून दिसतं. माझे वडील एअर फोर्समध्ये होते.
मालती मुलाखतीवेळी 'एका प्रसिद्ध दिग्दर्शकानं मला आपल्या ऑफिसमध्ये बोलवलं अन् चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला. मालती म्हणाली, मी एका प्रोजेक्टसाठी त्यांना सातत्यानं भेटत होते. ज्यावेळी काम संपलं त्यावेळी मालती त्या दिग्दर्शकाला साईड हग केला होता. त्याच्या बदल्यात त्या दिग्दर्शकानं मालतीच्या ओठावर चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता.
मालती म्हणाला मी स्तब्धच झाले होते. मला काय करावं हेच कळत नव्हतं. मी त्यांना तिथं गप्प बसवलं. त्यानंतर मी त्यांना कधी भेटले नाही. ते खूप वयस्कर होते. मी त्यांना माझ्या वडिलांसमान मानत होते. त्या दिवशी इंडस्ट्रीनं मला एक शिकवण दिली की कोणलाही बाप मानायचं नाही. त्या वयाचा व्यक्ती असं काही करू शकतो याच्यावर माझा विश्वासच बसला नाही. मला खूप राग आला होता.
मालती पुढे म्हणाली, 'लोकांना समजतं की ही कॉम्प्रमाईज करायला तयार नाही मग ते काम देत नाहीत. आता ही गोष्ट टेस्ट देखील झालं. मात्र आता त्यांना कळालं आहे की तुम्ही कॉम्प्रमाईज करणार नाही. त्यामुळे आता तुम्हाला शेवटच्या क्षणी रिप्लेस केलं जाईल. या गोष्टी माझ्यासोबत खूप झाल्या आहेत.
मात्र कोणी माझ्यासोबत मर्यादा ओलांडली नाही. या इंडस्ट्रीत मुलींच्या हातात सर्वकाही असतं. तुम्हाला हे गृहीत धरून चालावं लागतं की मुलं चान्स मारणारच. ते आपल्या पॉवर आणि पोजिशनचा वापर करणारच. मात्र त्यांच्यासमोर झुकायचं की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. माझ्या वडिलांनी देखील मला सांगितलं आहे की तू शिकलेली आहेस. जर काही झालं नाही करत घरी परत ये बाकी काही विचार करण्याची गरज नाही.