

टॅक्सी ड्रायव्हर बिलालपर्यंत धागेदोरे
शीर धडावगेळं केलं सोबत घेऊन गेला
उमाचं वादग्रस्त आयुष्य
बिलालसोबत प्रेम प्रकरण अन् लग्नाचा हट्ट
उमाचे विचित्र अंत्य संस्कार
Crime News Taxi Driver Bilal Cut Head of Uma: उमा नावाच्या 30 वर्षीय महिलेचे शीर नसलेला मृतदेह मिळाल्यामुळं एकच खळबळ उडाली होती. या घटनेमुळं संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. रविवारी ज्यावेळी या निर्घृण खुनाबाबत एक एक गोष्ट उजेडात येऊ लागली तसतसे या धडकी भरवणाऱ्या घटनेनं अंगावर काटा येऊ लागला. हा सर्व प्रकार हा एका टॅक्सी ड्रायव्हरच्या दुसऱ्या 'निकाह'पर्यंत येऊन थांबला.
पोलिसांनी ज्यावेळी उमाच्या शीर नसलेल्या मृतदेहाच्या गूढ खुनाचा तापस सुरू केला त्यावेळी त्यांचे धागेदोरे हे बिलाल या टॅक्सी ड्रायव्हरपर्यंत पोहचले. या बिलालने त्याची प्रेमिका उमाचा निर्घृण खून केला. या हत्येमागं बिलालचा एकमेव उद्येश होता की उमापासून सुटका करून घ्यायची अन् दुसरा निकाह करायचा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ डिसेंबरच्या संध्याकाळी बिलाल अन् उमाला घेऊन स्विफ्ट कारमध्ये बसून जवळपास ६ तास फिरत होते. शेवटी त्याने हरियाणाच्या यमुनानगर मधील कलेसर नॅशनल पार्कच्या निर्जन स्थळाची निवड केली.
कलेसर जंगलाच्या जवळ लालढांगच्या दरीत बिलालनं उमाचा जीव घेतला. बिबालनं फक्त उमाला मारलं नाही तर त्यानं उमाचे शीर धडापासून वेगळं केलं. हे राक्षसी कृत्य केल्यानंतर त्यानं थेट सहारनपूर येथील घर गाठलं. त्याला आपलीच प्रियसी उमाचं शीर धडापासून वेगळं केल्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. हा नराधम आपल्या निकाहच्या खरेदीच्या मागं लागला. त्यानं काही घडलेलंच नाही असा आव आणला होता.
दरम्यान पोलीस या बिलालचा माग काढत त्याच्यापर्यंत पोहचलेच. पोलिसांनी बिलालला अटक केली. पोलिसांनी उमाचं शीर देखील ताब्यात घेतलं. आता पोलीस या हत्येत वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घेत आहेत.
उमाचे आयुष्य सुरूवातीपासूनच वादग्रस्त राहिलं आहे. ती १३ वर्षाच्या मुलाची आई आहे. उमाचा पहिला पती जॉनीने सांगितलं की १५ वर्षापूर्वी उमाचे लग्न दुसऱ्या कोणाबरोबर तरी ठरलं होतं. मात्र ती माझ्यासोबत पळून आली. तिने माझ्यासोबत दीड वर्षे संसार केला अन् घटस्फोट घेतला.
उमाच्या मुलानं भावूक होऊन सांगितलं की, 'माथं वय १३ वर्षे आहे. घरात आई कायम भांडण करत होती. ती माझ्यासोबत राहण्यास तयार नव्हती. त्याचा भाऊ टिंकू कुमारने देखील १५ वर्षापासून उमाशी त्याचा कोणताही संपर्क नाही. या घटनेची माहिती त्यांना पोलिसांकडूनच मिळाल्याचं सांगितलं.
जवळपास दोन वर्षापूर्वी उमाची ओळख टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या बिलालशी झाली होती. त्यानंतर ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. उमाचा सर्व खर्च बिलाल करत होता. मात्र या नात्याची बिलालच्या कुटुंबियांना कोणतीच कल्पना नव्हती.
बिलालला दुसरा निकाह करायचा होता. त्याच्या य इच्छेनं त्याला इतकं क्रुर केलं की त्यानं उमाचे शीरच धडावेगळं केलं. उमा त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. मात्र बिलालचा निकाह दुसरीकडे निश्चित झाला होता. त्यानंतर बिलालनं उमाचा जीव घेण्याचा निर्णय घेतला.
यमुनानगर पोलीसांनी आरोपी बिलालला अटक केली. त्यापूर्वी शुक्रवारी उमाच्या धडाचे बेवारस म्हणून पोलिसांनी अंतिम संस्कार केले होते. आता तिचे शीर मिळाल्यामुळं रविवारी सायंकाळी उमाचे शीर कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं आता तिच्या शिराचे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.