
तेजस्विनी लोणारीच्या लग्नसोहळ्याने तिच्या चाहत्यांना भावुक केले आहे. खास मुंडावळ्या, मंगल अक्षदा आणि भरजरी शालूतील तिचा पारंपरिक ब्राइडल लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आयुष्याचा परफेक्ट साथीदार मिळाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असून, तिचा वेडिंग अल्बम सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे.
तेजस्विनीच्या फॅन्सना तिचा आणि तिच्या पतीचा दोघांचाही लग्नाचा लूक खूप आवडला आहे. त्यांच्या फोटोंवर लाईक आणि कौतुकाची बरसात होतेय
अत्यंत धामधुमीत तिचे लग्न पार पडले. तिने समाधान सरवणकर यांच्यासोबत लग्नगाठ बांधली
फोटोंमध्ये वधुवेषात तेजस्विनी अतिशय सुंदर दिसत आहे
तिच्यावर या लग्नाच्या अल्बमवर फॅन्सनी कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे
तेजस्विनीचे पती हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर आहे
दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात मुंबईत लग्न केले
तिने लग्नासाठी केलेला खास लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
लग्नात तेजस्विनीने गुलाबी रंगाची भरजरी साडी, गळ्यात नेकसेल, केसात गजरा, हातात बांगड्या असा लूक केला होता