मनोरंजन

मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांचा स्विमिंग पूलमध्‍ये व्यायाम❤️ (Video)

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

मलायका अरोरा-अर्जुन कपूर यांची लव्हस्टोरी कोणापासून लपलेली नाही. दोघांनीही अनेकदा आपलं प्रेम व्यक्त केलंय. दोघांनाही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आता दोघांचेही मालदीवमधील फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दोघांनीही सुट्ट्य़ा एन्जॉय केल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ यासाठी खास आहे की, मलायका अरोरा-अर्जुन कपूर स्विमिंग पूलमध्ये वर्कआऊट करताना दिसताहेत.

अर्जुनने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओसोबत तिने कॅप्शन लिहिलीय-When the girlfriend is a tougher taskmaster than your trainer !!! Hey @drewnealpt I'm working out even on holiday at the @patinamaldives thanks to @malaikaaroraofficial !!! ??? ❤️❤️❤️

या व्हिडिओमध्ये दोघेही व्यायाम करत आहेत. मालदीव येथील पटीना आयलँडवर अरोरा-कपूर दोघेही निवांत वेळ घालवताना दिसताहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती.

दोघांनीही मालदिवच्या व्हेकेशनचे काही फोटोज आपल्य़ा इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या फोटोंची विशेष गोष्ट म्हणजे दोघांनी एकत्र कुठलाही फोटो शेअर केलेला नाही. पण, ती समुद्र किनारी बिकिनीत सेल्फी घेताना दिसली होती. तर अर्जुन कपूर रिलॅक्स मूडमध्ये दिसला होता. थोडक्यात दोघेही मालदीवच्या समुद्र किनारी रोमँटिक मूडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला आहे.

अर्जुनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. तो बीचवर बसलेला दिसतोय. दोघांचे फोटो पाहून अंदाज लावू शकतो की, दोघे एकत्र व्हेकेशनवर गेले आहेत.

अर्जुनने फोटो शेअर करत लिहिलं- "जेव्हा ती तुम्हाला सुट्ट्यांमध्ये इन्स्टाग्रामवर स्क्रॉल करताना पकडते."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT