मनोरंजन

‘अशी ही बनवाबनवी’ : लक्ष्याचं डोहाळं जेवण अन्…

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : किती वेळाही पाहा – 'अशी ही बनवाबनवी' पुन्हा पुन्हा पाहावसं वाटणार. सदाबहार 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटाला आज ३३ वर्षे पूर्ण झाली. २३ सप्टेंबर, १९८८ रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला होता. 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सिध्दार्थ (शंतनू) यांच्या चौकट जोडीने धमाल उडवून दिली होती.

चित्रपटाला आज इतकी वर्षे झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे.

लक्ष्या जरी या जगात नसला तरीही त्याची आठवण या चित्रपटामुळे कायम लक्षात राहिली आहे.

बनवाबनवी चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहे.

या चित्रपटात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे आणि सिद्धार्थ रे यांच्या मुख्य भूमिका होत्या.

हा चित्रपट 'बीवी और मकान' या हृषिकेश मुखर्जी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक आहे.

या कलाकारांनी साकारल्या या व्यक्तिरेखा –

लक्ष्मीकांत बेर्डे – परशुराम

अशोक सराफ – धनंजय माने

सुशांत रे – शंतनू माने

सचिन पिळगावकर – सुधीर

सुप्रिया पिळगावकर – मनीषा

निवेदिता जोशी – सुषमा

प्रिया बेर्डे – कमळी

अश्विनी भावे – माधुरी

सुधीर जोशी – विश्वास सरपोतदार

नयनतारा – लीलाबाई काळभोर

विजू खोटे – बळी

अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले याची मजेदार गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'.

या चित्रपटातील सर्व कलाकार हे उत्तम विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूप विनोदी आहे.

स्त्री पात्र –

या चित्रपटात सचिन आणि लक्ष्याने साकारलेले स्त्री पात्र उत्तम होतेय खासकरून लक्ष्याने साकारलेली भूमिका. तिचे झालेले डोहाळे जेवण आणि डोहाळे जेवणाच्या सोहळ्यात गायलेले कुणीतरी येणार येणार गं… हे गाणे अप्रतिमच आहे.

या चित्रपटातील गाणी अशी –

* हृदयी वसंत फुलताना

* ही दुनिया मायाजाल

* अशी ही बनवाबनवी

* कुणीतरी येणार येणार गं.

केवळ ३ रुपये तिकिट

मजेची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या तिकिटाचे दर ३ रुपये होते. फर्स्ट क्लास ३ रुपये आणि बाल्कनी ५ रुपये दर होता.

३ रुपयांचे ३ कोटी कधी झाले, हे पटकन लक्षात येत नाही. त्याकाळी या चित्रपटाच्या सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लच्या पाट्या लागायच्या.

त्‍या काळी या चित्रपटाने ३ कोटींचा गल्ला जमवणे साधीसुधी गोष्ट नव्हती.

आजही ३३ वर्षांनंतर हा चित्रपट लागला की, तो पाहण्याचा मोह आवरत नाही.

हेही वाचलं का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT