मनोरंजन

मुलगी झाली हो : विलास पाटील यांच्याविषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनयाचं फॅड होतं. सतत मनात काहीतरी गलबल सुरू होतं. पण, म्हणतात ना, ऊपर वाला जब देता है तो छप्पर फाड के देता है. असंच काहीसं एका अभिनेत्याबाबत घडलं. तो मराठी अभिनेता म्हणजे किरण माने. स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो मालिकेत विलास पाटीलची भूमिका किरण माने यांनी साकारलीय. पण, तुम्हाला त्यांच्याविषयी या गोष्टी माहिती आहेत का?
मुलगी झाली हो मालिकेत माऊच्या (साजिरी) वडिलांची भूमिका किरण यांनी साकारली. त्यांचा या मालिकेतील अभिनय प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. त्यांच्या या मालिकेतील प्रत्येक अभिनयाला प्रेक्षकांनी दाद दिलीय. तुम्हाला माहितीये का, एक दुकानदार म्हणून काम करणाऱ्या किरण यांचा इथवरपर्यंतचा प्रवास कसा होता.

किरण हे मराठीतील प्रतिभावंत अभिनेते आहेत. मराठीतील अनेक चित्रपट, मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. नाटकांत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

किरण यांचे परफेक्‍ट मिस मॅच हे नाटक गाजले. स्वराज्य मराठी पाऊल पडते पुढे आणि कान्हा अशा अनेक चित्रपटांतील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. झी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत त्यांची भूमिका आहे.

तसेच ऑन ड्युटी २४ तास, कान्हा, श्रीमंत दामोदरपंत अशा चित्रपटांत ते दिसले. याशिवाय माझ्या नवऱ्याची बायको, पिंपळपान, भेटी लागी जीवा, मुलगी झाली हो अशा अनेक मालिकेतही त्यांनी भूमिका साकारल्या.

किरण यांना अभिनयाचं वेड होतं. पण, त्यांनी नाटक-अभिनयाचा 'नाद' सोडला. गुपचूप साताऱ्याला आले. हायवेला वाढे फाट्यावर 'किरण ऑटोमोटिव्ह' हे दुकान थाटलं.

१७ -१८ वर्षांपूर्वी जर किरण ऑटोमोटिव्ह हे दुकान जर बंद केलं नसतं. तर त्यांची आज अभिनेता म्हणून ओळख झाली नसती.

सातार्‍यात हायवेवर किरण यांचं इंजिन ऑईलचं दुकान होतं. पोटापाण्याचा प्रश्न होता. त्यामुळे मनाविरूद्ध इंजिन ऑईलंचं काम करावं लागत होतं. नाटक आणि अभिनय सोडून 'इंजिन ऑईल'च्या धंद्यात ते उतरले होते.

पण, त्यांची अक्षरश: घुसमट होत होती. सुदैवाने नव्हे तर दुर्दैवाने दुकानाचा व्यवसाय चांगला चालू लागला.

आता पैसेपण जास्त मिळताहेत म्हटलं तर कुणी कसाला आपलं बसलेलं बस्तान मोडेल? या व्यवसायात ते अडकले. 'पैसा की पॅशन'? असा प्रश्न त्यांना पडला होता. पोरंग पण, चांगला व्यवसाय करायला लागलंय म्हटल्यावर त्यांच्या घरचेही खूश होते.

kiran mane

रद्दीच्या पेपरच्या एका जाहिरातीने बदललं आयुष्य

एक दिवस दुकानातून त्यांनी हिशोबाची वही काढली. त्यातचं पेपरचं रद्दीसाठी काढून ठेवलेलं एक पान खाली पडलं. त्या पानावर छोट्या जाहीरात होती. आपल्याला जेवताना पेपर खाली घ्यायची सवय असते.

असाचं प्रसंग त्यावेळी दुकानात जेवताना त्यांच्यासोबत घडला होता. त्यांनी जेवताना टिफीनखाली पेपर घेतला. त्यावर 'पं. सत्यदेव दूबे' असे लिहिले होते.

पुण्यातल्या 'समन्वय'तर्फे पं. सत्यदेव दुबे यांची 'अभिनय कार्यशाळा' आयोजित असं त्यात लिहिलं होतं. त्यावेळी योग्य विचार केला म्हणून किरण आज अभिनेता झाले. असं म्हणायला हरकत नाही.

'समन्वय' च्या संदेश कुलकर्णी यांना फोन लावला आणि यशाचा मार्ग सापडला.

दुकानाला जे कुलूप लावलंय ते आजतागायत उघडलं नाही

त्यांनी दुकानाला कुलूप लावलं. ते आटपर्यंत उघडलं नाही. माने यांचं भिनेता होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. माने यांच्या संघर्षाचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

हेही वाचलं का ? 

marathi

SCROLL FOR NEXT