Kiara Advani Second Baby: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हे दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. या दोघांनी ही आनंदाची बातमी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली आहे. या लोकरीने विणलेला एक छोट्या बाळाचा मोजा दाखवण्यात आला आहे. कियारा आणि आणि सिद्धार्थ यांच्या मुलीच्या हातात हा मोजा असून त्याला, 'पुन्हा एकदा सर्वात मोठ्या गिफ्टचा आशीर्वाद. आमचे ह्रदय हे प्रेम आणि कृतज्ञतेनं भरून आलं आहे.' असे कॅप्शन देण्यात आले आहे.
कियाराच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडला आहे. चाहते, फॉलोअर्स आणि चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी हार्टवाला इमोजी शेअर करत लव्ह यू अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री अथिया शेट्टीने देखील कियाराच्या या पोस्टवर कमेंट केली आहे.
अभिनेत्री भूमी पेडणेकर, पत्रलेखा, मनिष मल्होत्रा, ताहिरा कश्यप आणि इतरांनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. चित्रपट निर्माती रेखा कपूर आणि मसाबा गुप्ता यांनी कियाराचे आणि सिद्धार्थचे अभिनंदन केलं आहे.
कियारा आणि सिद्धार्थचे २०२३ मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर १५ जुलै २०२५ मध्ये त्यांच्या घरात लक्ष्मीची पावले उमटली. त्यांना सरायहा नावाची मुलगी झाली. या दोघांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये देखील अशाच प्रकारे आपली पहिले प्रेग्नन्सी जाहीर केली होती.
यावर्षी सिद्धार्थ आणि कियारा या दोघांचे देखील काही प्रोजेक्ट रिलीज झाले आहेत. कियाराचा टॉक्सिक रिलीज झाला. वादामुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. तसेच त्याने चांगले बॉक्स ऑफिक कलेक्शन देखील केले. सिद्धार्थचा दखील द विवान हा चित्रपट रिलीज झाला आहे. त्यात तमन्ना भाटिया त्याच्या अपोझिट आहे. त्याचे देखील समाधानकारक बॉक्स ऑफिस ओपनिंग झालं आहे.