मनोरंजन

Merry Christmas ?: कॅटरीना कैफने शेअर केले ‘मेरी ख्रिसमस’चे पोस्टर

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : फोन भूत चित्रपटातून सर्वांनाचे मनोरंजन केल्यानंतर आता कॅटरीना कैफने विजय सेतुपतीसोबत आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केलीय. या चित्रपटामध्ये विजय सेतुपती आणि कॅटरीना कैफ मुख्ये भूमिकेत दिसणार आहे. कॅटरीना  (Katrina Kaif) फॅन्ससोबत आपले नवे अपडेट्स शेअर करणं विसरत नाही. अवघ्‍या काही दिवसांमध्‍ये २०२२ निरोप घेणार आहे.  तिने आपल्या फॅन्ससोबत एक गुड न्यूज शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर आपला थ्रिलर चित्रपट 'मेरी ख्रिसमस' ? पोस्टर शेअर केले.

श्रीराम राघवन द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात पहिल्यांदा कॅटरीना कैफ साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती (Vijay Sethupati) सोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही बड्या स्टार्सचा हा पहिला चित्रपट असेल, जो ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज होईल पण, एका ट्विस्टसोबत. दोघांच्या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी फॅन्स खूप उत्साहित आहे.

Merry Christmas

कॅटरीना कैफ-विजय सेतुपतीला फॅन्सकडून ख्रिसमस गिफ्ट

कॅटरीना कैफ आणि विजय सेतुपतीने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. कॅटरीनाने म्हटले की, हा चित्रपट ख्रिसमसच्य़ा ? निमित्ताने रिलीज केलं जाणार होतं. परंतु, यामध्ये एक ट्विस्ट आहे. विजय सेतुपतीने कमिंग सून अशी कॅप्शन देऊन फॅन्सना २०२३ चा ॲडव्हान्स गिफ्ट दिलं आहे.

या भाषांमध्ये होणार रिलीज

फॅन्स मोठ्या पडद्यावर कॅटरीना कैफ आणि विजय सेतुपती जोडी पाहायला उत्सुक आहेत. २०२३ मध्ये चित्रपटगृहात हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेत रिलीज करण्यात येईल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT