अभिनेते कमल हासन ( Kamal Haasan) यांनी कन्‍नड भाषेबाबत केलेल्‍या विधानावर माफी मागण्‍यास नकार दिला आहे.  (Image source- X)
मनोरंजन

Kamal Haasan : 'कन्‍नड' विधानावर 'माफीनाम्‍या'स कमल हासन यांचा नकार!

कर्नाटकात सध्‍या 'ठग लाईफ' प्रदर्शित करणार नसल्‍याची उच्‍च न्‍यायालयात माहिती

पुढारी वृत्तसेवा

अभिनेते कमल हासन ( Kamal Haasan) यांनी कन्‍नड भाषेबाबत केलेल्‍या विधानावर माफी मागण्‍यास नकार दिला आहे. अभिनेते कमल हासन यांच्या वकिलांनी कर्नाटक उच्च न्यायालयात सांगितले की, 'ठग लाईफ' सध्या राज्यात प्रदर्शित होणार नाही. दरम्‍यान, आज सकाळी उच्‍च न्‍यायालयात कमल हासन यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्‍यायालयाने त्‍यांच्‍या विधानासह माफी न मागण्‍याच्‍या वृत्तीवर ताशेरे ओढले होते.

कलम हसन यांनी काही दिवसांपूर्वी तमिळ भाषेतूनच कन्‍नड भाषेची निर्मिती झाली आहे, असे विधान केले होते. यावरुन कन्‍नड भाषिकांच्‍या भावना दुखावल्‍या. त्‍यांचा आगामी ठग लाईफ या चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका कन्‍नड संघटनांनी घेतली. चित्रपटाच्‍या प्रदशर्नाला संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. यावर एकल खंडपीठाचे न्‍यायमूर्ती नागाप्रसन्ना यांच्‍यासमोर सुनावणी झाली. कमल हसन यांचे वकील ध्‍यान चिनप्‍पा यांनी न्‍यायालयात सांगितले की, ठग लाईफ कर्नाटकात चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही वाट पाहू शकतो. आम्ही सध्या कर्नाटकात चित्रपट प्रदर्शित करणार नाही. निर्मात्यांच्या कायदेशीर पथकाने कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स (केएफसीसी) सोबत पुढील चर्चा करण्यासाठी एका आठवड्याची स्थगिती मागितली आहे.

कन्नड भाषा आणि लोकांबद्दल प्रामाणिक आदर

यावेळी वकिलांनी कमल हासन यांनी केएफसीसीला पाठवलेले पत्रही सादर केले. या पत्रात त्‍यांनी कन्‍नड भाषेबद्दल प्रामाणिकपणे लिहिले गेले आहे. कन्‍नड भाषा आणि लोकांबद्दल आदर व्‍यक्‍त केला आहे. प्रत्येकाला स्वतःला व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असेही ध्‍यान चिनप्‍पा यांनी न्‍यायालयास सांगितले.

सर्व काही ठीक, फक्‍त एक वाक्‍य नाही : कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

कमल हासन यांनी पत्रात काही भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या गेल्या तरी, त्यात थेट माफी मागितली गेली नाही. या विधानात सर्व काही ठीक आहे. फक्त एक वाक्य गहाळ आहे, असे निरीक्षण न्यायमूर्ती एम नागाप्रसन्ना यांनी नोंदवले. “माफी मागणे ही सक्ती नाही. त्यांनी अनुकरण करायला हवे होते. विधान स्पष्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु माफी मागण्याचा फक्त एकच मार्ग आहे, असेही न्यायमूर्ती एम नागाप्रसन्ना यांनी यांनी स्‍पष्‍ट केले.

'ठग लाईफ'साठी कमल हसन यांनी घेतली हाेती हायकाेर्टात धाव

कलम हसन यांनी काही दिवसांपूर्वी तमिळ भाषेतूनच कन्‍नड भाषेची निर्मिती झाली आहे, असे विधान केले होते. यावरुन कन्‍नड भाषिकांच्‍या भावना दुखावल्‍या. त्‍यांचा आगामी ठग लाईफ या चित्रपट प्रदर्शित होवू देणार नाही, अशी भूमिका कन्‍नड संघटनांनी घेतली. तसेच कन्नड भाषेच्या उत्पत्तीबद्दलच्या वक्तव्याबद्दल केलेले विधानावर माफी मागण्यासही त्‍यांनी नकार दिला होता. यानंतर त्‍यांनी ठग लाईफ या चित्रपटाच्‍या प्रदशर्नाला संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारी याचिका कर्नाटक उच्‍च न्‍यायालयात दाखल केली होती. यावर एकल खंडपीठाचे न्‍यायमूर्ती नागाप्रसन्ना यांच्‍यासमोर सुनावणी झाली.

"तुम्ही इतिहासकार आहात का?" : हायकोर्टाने ओढले ताशेरे

"कन्नड भाषेचा जन्‍म हा तामिळ भाषेमधून झाला आहे, असे विधान तुम्‍ही कोणत्‍या आधारावर केलं? तुम्ही इतिहासकार आहात का? की भाषाशास्त्रज्ञ?. तुम्ही कोणत्या आधारावर कर्नाटकच्या लोकांच्या भावनांना धक्का दिला? कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला येऊ शकत नाही. या (दाव्या) ला समर्थन देण्यासाठी कुठून साहित्य आणले?," अशी प्रश्‍नांची सरबत्ती करत कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने अभिनेते कमल हासन ( Kamal Haasan) यांची हजेरी घेतली. पाणी, जमीन आणि भाषा हे नागरिकांसाठी अत्‍यंत महत्त्‍वाच्‍या गोष्‍टी आहे. देशाची फाळणी ही भाषिक आधारावर झाली. कोणत्‍याही नागरिकाला दुसर्‍यांचा भावना दुखावण्‍याचा अधिकार नाही, असे खडेबोलही न्‍यायमूर्ती नागाप्रसन्‍ना यांनी सकाळी झालेल्‍या यावेळी सुनावले.

तुम्ही कर्नाटकच्या लोकांच्या भावनांना धक्का दिला...

कन्नड भाषेच्या उत्पत्तीबद्दलच्या वक्तव्याबद्दल केलेले विधानावर माफी मागण्यास नकार देत कमल हासन यांनी स्‍वत:हून वादाची परिस्‍थिती निर्माण केली आहे. माफी मागणार नाहीत?, असे ते का म्‍हणत आहेत. कोणतीही भाषा दुसऱ्या भाषेतून जन्माला येऊ शकत नाही. तुम्‍ही तुमच्‍या विधानाचे समर्थन देण्यासाठी साहित्य काेठे आहे? कर्नाटकच्या लोकांनी केवळ तुम्‍ही माफी मागावी एवढीच मागणी केली आहे. तुम्ही कर्नाटकच्या लोकांच्या भावनांना धक्का दिला आहे... कोणत्या आधारावर? तुम्ही इतिहासकार आहात का? की भाषाशास्त्रज्ञ?, असा सवाल करत कोणत्याही नागरिकाला भावना दुखावण्याचा अधिकार नाही. पाणी, जमीन आणि भाषा नागरिकांसाठी महत्त्वाची आहेत. या देशाची फाळणी भाषिक आधारावर झाली, असे स्‍पष्‍ट करत न्यायाधीश एम नागाप्रसन्ना यांनी हासन यांच्या विधानाबद्दल माफी मागण्यास नकार दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT