Kamal Haasan : अभिनेते कमल हासन पुन्‍हा वादाच्‍या भोवर्‍यात! आता नेमकं काय बोलून बसले?

कन्‍नड भाषेवर व्‍यक्‍त केलेल्‍या मतामुळे कर्नाटकात निदर्शने, 'ठग लाईफ'वर बंदी घालण्याचा इशारा
Kamal Haasan
प्रातिनिधक छायाचित्र. Pudhari Photo
Published on
Updated on

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांनी रुपेरी पडदा ते राजकारणापर्यंत केलेली मुशाफिरी सर्वश्रूत आहे. मात्र मागील काही वर्षांमध्‍ये त्‍यांनी केलेल्‍या विधानांमुळे कमल हासन आणि वाद हेही एक नवे समीकरण झाले आहे. आता त्‍यांनी कन्‍नड भाषेबाबत व्‍यक्‍त केलेल्‍या मतामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्याविरुद्ध कर्नाटकात निदर्शने सुरू झाली आहेत.

कमल हासन नेमकं काय म्‍हणाले?

कमल हासन यांचा नवीन चित्रपट 'ठग लाईफ'चे काही आठवड्यांपूर्वी ऑडिओ लाँच चेन्नईत झाले. यानिमित्त झालेल्‍या कार्यक्रमातील भाषणाची सुरुवात त्‍यांनी "उयिरे उरावे तमिळ" या वाक्याने केली. या वाक्‍याचा अर्थ 'माझे जीवन आणि माझे कुटुंब ही तमिळ भाषा आहे', असा आहे. या कार्यक्रमात कन्नड अभिनेते शिवराजकुमार उपस्‍थित होते. याबाबत बोलताना कमल हसन म्‍हणाले की, ही जमीन (चेन्‍नई) माझे कुटुंब आहे, या भावनेतून शिवराजकुमार हे चेन्‍नईला आले आहेत. म्‍हणूनच मी माझ्‍या भाषणाची सुरुवातही 'माझे जीवन आणि माझे कुटुंब ही तमिळ भाषा आहे,' अशी केली आहे, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. तसेच शिवराजकुमार यांच्‍याकडे पाहत तुमची भाषा म्‍हणजे कन्नड भाषेचा जन्‍म हा तामिळमधून झाला आहे. कन्नड भाषेची उत्पत्ती तामिळ भाषेतून झाल्‍याने तुमचाही यामध्‍ये समावेश होता, असे विधान त्‍यांनी केले.

Kamal Haasan
जावयासोबत ३८ वर्षानंतर चित्रपट करू शकलो, कमल हासन म्‍हणाले, या विलंबावर...

कमल हासन यांनी केला कन्नड भाषेचा अपमान केला : येडियुरप्पा

कर्नाटकमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि काही संघटनांनी कमल हासन यांच्‍या विधानावर जोरदार टीका केली आहे. कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी 'एक्स' पोस्‍ट करत कमल हसन यांचे वर्तन असभ्‍य असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यांनी कन्नड भाषेचा अपमान केल्याचा आरोपही केला आहे. येडियुरप्पा म्‍हणाले की, प्रत्‍येकाने आपल्‍या मातृभाषेवर प्रेम करायला हवे; परंतु अन्‍य भाषेचा अनादर करणे असभ्‍य वर्तन आहे. किमान कलाकारांनी तरी प्रत्‍येक भाषेचा आदर करावा.

image-fallback
कमल हासन राजकीय आखाडा का गाजवू शकले नाहीत?

तत्‍काळ माफी मागा

कमल हासन यांनी तामिळ भाषेबरोबर कन्‍नडसह अनेक भारतीय भाषांमध्‍ये काम केले आहे. त्‍यांनी तमिळ भाषेचा सन्‍मान करताना कन्‍नड अभिनेते शिवराजकुमार यांचा समावेश करुन कन्‍नड भाषेचा अपमान केलाआहे. त्‍यांचे वर्तनही अहकाराची परिसीमा आहे. कन्नड चित्रपटांमध्ये काम करणारे कमल हासन हे कन्नड आणि कन्नड लोकांची उदारता, याचे त्‍यांना विस्‍मरण झाले आहे, असा आरोपही विजयेंद्र येडियुरप्पा यांनी केला आहे. दक्षिण भारतात सुसंवाद आणणारे कमल हासन गेल्या काही वर्षांपासून सतत हिंदू धर्माचा अपमान करत आहेत. ते विविध विधान करुन धार्मिक भावना दुखावत आहेत. आता त्यांनी ६.५ कोटी कन्नड लोकांचा स्वाभिमान दुखावून कन्नडचा अपमान केला आहे. कमल हासन यांनी ताबडतोब कन्नड लोकांची बिनशर्त माफी मागावी, अशी मागणीही विजयेंद्र येडियुरप्पा यांनी केली आहे.

Kamal Haasan
Kamal Haasan : ‘चोल साम्राज्यावेळी नव्हता हिंदू धर्म’; कमल हासन यांच्या विधानाने वाद

कर्नाटकात निदर्शने, बंगळूरुमध्‍ये ठग लाईफचे पाेस्‍टर फाडले

कन्नड भाषेचा जन्‍म हा तामिळ भाषेमधून झाला आहे, या विधानाने कन्‍नडमध्‍ये संतापाची लाट उसळली आहे.कर्नाटकात यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निदर्शनेही सुरू झाली आहेत. कर्नाटकात कमल हासन यांच्‍या चित्रपटावर बंदी घालण्याचा इशारा देण्‍यात आला आहे. कन्नड समर्थक संघटनांनी या वक्तव्याचा निषेध केला आणि कमल हासन यांनी अशी विधाने सुरू ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देत कार्यकर्त्यांनी बंगळूरुमध्‍ये ठग लाईफचे पाेस्‍टर फाडले. दरम्‍यान, दरम्‍यान, प्रख्‍यात दिग्‍दर्शक मणिरत्नम यांच्यासोबतचा कमल हासन यांचा 'ठग लाईफ' हा चित्रपट ५ जून रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. मणिरत्नम आणि कमल हासय यांचा जवळजवळ चार दशकांनंतरचा दुसरा चित्रपट आहे. दोघांनीही 'नायकन' मध्ये एकत्र काम केले होते.

Kamal Haasan
मेटाव्‍हर्समध्‍ये प्रवेश करणारे कमल हसन पहिले भारतीय अभिनेते

... तर कर्नाटकात कमल हासन यांच्‍या चित्रपटावर बंदी

कन्‍नड रक्षक वेदिकेने म्‍हटलं आहे की, "कमल हासन यांना कर्नाटकमधून चित्रपटातून पैसा कमवायचा नाही का? तरीही ते कन्नडचा अपमान करत आहोत. आज तुम्ही राज्यात होता आणि आम्ही तुम्हाला काळी शाई लावण्यास तयार होतो. तुम्ही पळून गेला आहात. आम्ही तुम्हाला इशारा देतो,र तुम्ही कर्नाटक आणि राज्यातील लोकांविरुद्ध बोललात तर तुमच्याविरुद्ध निदर्शने होतील. कर्नाटकात तुमचा चित्रपट बंदी घातली जाईल.”

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news