मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' मध्ये रोहित सराफ दिसणार?

कमल हासन यांच्यासोबत दिसणार मराठमोळा रोहित सराफ
Kamal Haasan Rohit Saraf film Thug Life
कमल हासन-रोहित सराफ चित्रपटात एकत्र दिसणार Twitter

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोहित सराफ पुन्हा एकदा नव्या चित्रपटात दिसणार आहे. मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ'मध्ये काम करण्यास रोहित सज्ज झाला आहे.

Kamal Haasan Rohit Saraf film Thug Life
साबरमती ट्रेन दुर्घटनेचे सत्य 'ॲक्सीडेंट ऑर कांस्पिरेसी गोधरा'मधून समोर येणार
Summary

दिग्गज अभिनेते कमल हासन यांच्या सोबत दिसणार

मणिरत्नम दिग्दर्शित कमल हासन, रोहित सराफ स्टारर 'ठग लाईफ' या चित्रपटाचा भाग होणार आहे. रोहित सराफ सातत्याने प्रभावी भूमिका करून प्रेक्षकांची मने जिंकत आहेत.

तो मणिरत्नम यांच्या 'ठग लाईफ' या चित्रपटाचा महत्त्वपूर्ण भाग होणार असल्याचं समजतय. ही नवीन आणि आव्हानात्मक भूमिका तो कशी साकारणार, हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Kamal Haasan Rohit Saraf film Thug Life
फिटनेस आयकॉन सोनू सूदचं वर्कआऊट व्हायरल, फतेहसाठी अशी घेतली मेहनत

रोहितच्या भूमिकेबद्दलचे तपशील अजून समोर आले नसून या या बातमीने त्याच्या चाहत्यांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रोहितने आधीच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. तो कथेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे, असे एका सूत्राकडून समजते. मणिरत्नम ऑगस्ट २०२४ पर्यंत चित्रपट संपवणार, अशी अपेक्षा आहे आणि निर्माते डिसेंबर २०२४ मध्ये रिलीज करणार आहेत.

रोहित सराफ इश्क विश्क रिबाऊंडमुळे चर्चेत

रोहित सध्या 'इश्क विश्क रिबाउंड' मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी मिळणाऱ्या प्रेमाचा आनंद घेत आहे. राघवच्या त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांशी वेगळं नात जोडल आहे. चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव झाला. रोहित 'मिसमॅच्ड सीझन ३' मध्ये ऋषी शेखावतच्या भूमिकेत पुन्हा दिसणार आहे. तो वरुण धवन, जान्हवी कपूर आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्यासोबत 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' नावाच्या धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटात काम करणार आहे.

Kamal Haasan Rohit Saraf film Thug Life
संदीप पाठक म्हणतोय 'जगात भारी पंढरीची वारी'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news