

पुढारी ऑनलाईन :
भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते कमल हासन मोठ्या अंतरानंतर पुन्हा एकदा आपल्या जावयासोबत दिसणार आहेत. कमल हासन यांनी आपले अनुभव शेअर केले. यावेळी त्यांनी चित्रपटांच्या भविष्यावरही भाष्य केले.
कमल हासन यांचे मोठे भाउ चारू हासन यांचे मणिरत्नम हे जावई आहेत. त्यांच्यासोबत काम करायला कमल हासन यांना तब्बल ३८ वर्षे लागली. दोघांचा या आधिचा चित्रपट 'नायकन' ने कमल हासन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. आता पुन्हा एकदा हे दोघेही एकत्र येणार आहेत. त्यांचा आगामी 'ठग लाइफ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा मणी रत्नम यांच्या सासरच्या निर्मिती कंपनी राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलसाठीचा पहिला चित्रपट आहे. कमल हासन त्यांच्या जावयाबद्दल काय म्हणतात ते वाचा...
कमल हासन यांच्या 'एक दूजे के लिए' चित्रपटाने उत्तर भारतीय प्रेक्षकांना १९८१ साली भुरळ घातली. त्यांना आता दिग्दर्शक मणिरत्नममध्ये त्याचे दिग्दर्शक के. बालचंदर यांची प्रतिमा दिसते. के बालाचंदर यांना कमल हासन हे चित्रपट क्षेत्रातील आपले गुरू मानतात.
चेन्नईमध्ये 'ठग लाईफ' चित्रपटाच्या पहिल्या गाण्याच्या रिलीजसाठी जमलेल्या कलाकारांमध्ये कमल हासन हसत हसत मणिरत्नम यांच्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, "मी त्यांना अंजू आरा मणिरत्नम म्हणतो, म्हणजेच सकाळी ५:३० वाजताचा मणिरत्नम. ब्रह्म मुहूर्तावर काम करणे ही त्यांची सवय आहे." मणिरत्नम यांनी बनवलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाची तयारी पहाटे चार वाजता सुरू होते हे फार कमी लोकांना माहिती असेल. सूर्याचा पहिला किरण पृथ्वीवर पडताच कॅमेरा फिरू लागतो.
वयाच्या ७० वर पोहोचलेल्या कमल हासन यांचे ६८ वर्षीय मणिरत्नम यांच्याशी चांगले पटते. तसे मणिरत्नम हे घरचे जावईच आहेत. कमल आठवतात, “आम्ही चेन्नईतील अलवरपेट येथील एल्डमास रोडवर पार्क केलेल्या स्कूटरवर तासनतास घालवायचो. आम्ही सिनेमाबद्दल बोलत असू. आम्ही स्वतःबद्दल, आमच्या कुटुंबांबद्दल आणि आमच्या स्वप्नातील सिनेमा कसा असेल याबद्दल बोलत असू. तेव्हापासून काहीही बदललेले नाही. आम्ही मोठी स्वप्ने पाहिली. नंतर आम्हाला बाजार आणि आमच्या बजेटनुसार त्यांची संख्या कमी करावी लागली. लोक आम्हाला अनेकदा विचारतात की 'नायकन' नंतर आम्ही दोघांनी एकत्र चित्रपट का केला नाही, म्हणून मला वाटते की ती आमची चूक होती. आणि, आम्हाला पुन्हा एकत्र आणण्याचे एकमेव कारण म्हणजे आमचे प्रेक्षक.”
'नायकन' चित्रपटानंतर, मणिरत्नम यांनी 'ठग लाईफ' चित्रपटात कमल हासन यांचे दिग्दर्शन करण्यास सहमती दर्शविली आणि कमल हासन याचे संपूर्ण श्रेय त्यांचे मोठे भाऊ चारू हासन यांना देतात. नायकनला इलैयाराजा यांचे संगीत होते, यावेळी दोघांनी ए.आर. रहमानला आणले आहे. कमल हासन म्हणतात, "'ठग लाईफ' हा चित्रपट मला अशा प्रकारचा चित्रपट पाहायचा आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्याची निर्मिती करण्याची आणि त्यात अभिनय करण्याची संधी मिळाली. माझे चाहते गेल्या अनेक वर्षांपासून मला विचारत आहेत की मी मणीसोबत पुढचा चित्रपट कधी करणार आहे. या विलंबाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि एका प्रकारे, 'ठग लाईफ' हा चित्रपट आमच्या चाहत्यांना आमच्याकडून समेट घडवून आणण्याची ऑफर मानता येईल."
दरम्यान, कमल हासन यांनीही सिनेमाच्या भविष्याबद्दल मोकळेपणाने बोलले. ते म्हणतात, "सिनेमापेक्षा लोकशाही कला दुसरी कोणतीही नाही, पण लोक त्यांच्या प्रसिद्धी, समृद्धी आणि शंकांमध्ये इतके रमलेले असतात की ते याकडे लक्ष देत नाहीत. रंगमंचावर असलेले लोक फक्त त्यांच्या संबंधित विभागांचे प्रमुख असतात, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांची एक संपूर्ण फौज असते आणि या फौजेत खूप प्रतिभावान तरुणांचा समावेश आहे जे येत्या काळात त्यांची प्रतिभा दाखवतील आणि सिनेमाच्या भविष्याचा मार्गही मोकळा करतील. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की येत्या काळात सिनेमा अधिक लोकशाहीवादी होणार आहे."
चित्रपट 'ठग लाईफ' च्या पहिल्या गाण्याच्या लॉन्चवर देखील चर्चा झाली. त्यांच्यासोबत काम करत असलेल्या अभिनेता सिबूने आपल्या गाण्याच्या शुटींगवेळेच्या आठवणी सांगितल्या. दिल्लीत भीषण उष्णतेत गाण्याचे शुटींग सुरू होते. सिबू हे कमल हासन यांच्यापासून थोडे दूर बसले होते. मात्र कमल हासन यांनी बोलावून मला आपल्याजवळ बसवले. एसटीआरने सांगितले, मला वाटले कमल हासन त्यांच्या वयानुसार आरामात ठुमके लावतील. मला फक्त त्यांच्यासोबत सावकाश त्यांच्यासोबत ताल मिळवून ठेवायचा आहे. मात्र जसे एक्शन म्हंटले, कमल हासन यांनी ज्या प्रकारे नाचण्यात वेग घेतला तेंव्हा आम्ही सगळे दंग राहिलो होतो. कमल हासन यांनी प्रशिक्षित भरतनाट्यम आणि कथक नर्तक आहेत. त्यामुळे आताही ते आपल्या प्रस्तूतीमध्ये सर्व उर्जेचा वापर तितक्याच खुबिने करतात.