मनोरंजन

Naagin 6 : एकता कपूरने शो हिट करण्यासाठी केले ५ मोठे बदल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

एकता कपूरची लोकप्रिय मालिका नागिन-६ ची (Naagin 6) लवकरच टीव्हीवर धमाकेदार एन्ट्री होणार आहे. नागिन-६ (Naagin 6) सुपरहिट होण्यासाठी एकता कपूरने कंबर कसलीय. तिने नागिन-६ विषयी नुकतचं एक ट्विटदेखील केले होते. आता मीडिया रिपोर्टनुसार, नागिन-६ चे कलाकार आणि कथेत अनेक बदल केले जात आहेत. निर्माते यंदा या मालिकेविशयी कोणतीही रिस्क घेऊ शकत नाहीत. निर्माते सध्या नागिन-६ च्या प्री प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहेत.

माहिरा शर्मा

निया शर्मा

नागिनसाठी ५५ ऑडिशन्स

नुकताच नागिन-६ च्या निर्मात्यांनी ५५ अदाकारांचे ऑडिशन घेतलं आहे. नागिन-६ मध्ये रुबीना दिलैक, जस्मिन भसीन आणि निया शर्मा यासारख्या अदाकारा दिसू शकतात. शहनाज गिल नागिनच्या भूमिकेत असावी, असं तिच्या चाहत्यांना वाटत आहे. दरम्यान, अशी माहिती समोर येतेय की, बिग बॉस स्टार माहिरा शर्माला नागिन-६ साठी ॲप्रोच देण्यात आलीय. पण, माहिरा शर्माचं मुख्य भूमिकेत असेल असे नाही.

रुबीना दिलैक

हॅण्डसम हंकची होणार एंट्री

रिपोर्टनुसार, बिग बॉस १५ मध्ये दिसलेला टीव्ही अभिनेता ईशान सहगलला नागिन ६ मध्ये मुख्य भूमिकेसाठी ॲप्रोच करण्यात आलं आहे.

अद्याप मुख्य अभिनेत्री नाही मिळाली

काही दिवसांपूर्वी एकता कपूरने ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, आतापर्यंत कुठल्याही अदाकाराला फायनल करण्यात आलेले नाही. एकता कपूर आता नागिन-६ साठी हिरोईन शोधत आहे.

रातोरात बदलली कहाणी

असं म्हटलं जात आहे की. यावेळी मालिकेची कहाणी कोरोना व्हायरसच्या अवतीभोवती फिरते. यावेळी नागिन कोरोनाला आपली ताकद दाखवणार आहे.

शाहीर शेख

या कलाकारांची नावे आली समोर

टीव्ही अभिनेता शाहीर शेख, आणि पर्ल व्ही पुरीचे नाव देखील नागिन ६ सोबत जोडलं गेलं आहे. नागिन ६ च्या प्रोमोसोबत ही गोष्ट स्पष्ट आहे की, यंदा नागिन कोरोनाशी लढणार आहे. नागिन संपूर्ण जगाला कोरोनापासून वाचवेल.
दरम्यान, एकताने नागिन-६ हिट करण्यासाठी मुंबईतील एका मंदिरात पूजा केली होती.

अर्जुन बिजलानी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT