मनोरंजन

Disha Patani : दिशा पटानीच्या पिंक बिकिनीने वाढवलं तापमान

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सध्या दिशाच्या पिंक रंगाच्या बिकिनीने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani ) नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओतील फोटोत दिशा पिंक रंगाची शिमरी ब्रालेट टॉप (बिकिनी) आणि सी-थ्री पँटस् परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी बिकिनीसोबत वॉल्यूमाइज्ड कर्ल आणि साजेशीर दागिन्यानी तिने आपला लूक पुर्ण केला आहे. व्हायरल झालेल्या फोटोत दिशाने एका हात स्वत: च्या मानेवर ठेवत दुसऱ्या हातात फोन धरला आहे. याशिवाय आणखी एका फोटोत दिशाच्या नजरेने चाहत्यांना घायाळ केलं आहे. याशिवाय व्हिडिओत दिशा एका रूममध्ये असून हटके पोझ देताना दिसली आहे.

या फोटोच्या कॅप्शमध्ये तिने '५० दशलक्ष ?? last one i promise ??असे म्हटले आहे.' यातील खास म्हणजे, दिशाने फोटोशूट वेळी दिलेली हटके पोझ. हा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. यासोबत दिशाने सोडलेल्या मोकळ्या केंसांनी तिच्या सौंदर्यांत आणखी भर घातली आहे.

हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच बॉलिवूड स्टार्ससोबत चाहत्यानी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. यात कोरिओग्राफर आणि म्युझिक दिग्दर्शक यांनी दिशाचे अभिनंदन करत कौतुक केले आहे. यावेळी एका युजर्संने 'तुला एक गोष्ट माहित आहे, तुझे हास्य खूपच मौल्यवान आहे.', 'सुंदर दिलाची सर्वात सुंदर व्यक्ती ?????????' असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजर्सने 'Hotty ❤️', 'बॉलिवूडची क्विन' असे म्हटले आहे. याशिवाय काही चाहत्यांनी फोटोंवर कॉमेन्टस करताना हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या फोटोतून दिशाने आपल्या 'फिट अँड टोन्ड' बॉडीचे दर्शन घडविले आहे.

याआधी दिशाने समुद्र किनार्‍यावरील बिकिनीतील आणि सिल्व्हर रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. शेअर केलेल्या फोटोत दिशा एका सोफ्यावर बसलेली आणि उभा राहून हटके पोझ देताना दिसली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Makeup and hair by me?'.असे लिहिले होते.

दिशाने 'एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून पहिल्यांदा पदार्पण केले होते. यानंतर तिने 'लोफर' (तेलगू चित्रपट) 'बागी-२','भारत', 'मलंग' या हिंदी चित्रपटातून अभिनयाचा ठसा उमटवला. याशिवाय तिचा आगामी 'एक व्हिलन रिटर्न्स' आणि 'योद्धा' चित्रपट चाहत्यांच्या भेटीस येत आहेत.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT