कोल्‍हापूरच्‍या प्रज्‍वलचा 'क्‍लिक' चमकला 'ॲपल मॅक्रो'मध्‍ये! | पुढारी

कोल्‍हापूरच्‍या प्रज्‍वलचा 'क्‍लिक' चमकला 'ॲपल मॅक्रो'मध्‍ये!

पुढारी ऑनलाईन डेस्क: ‘अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’ (Apple shot on iPhone micro challange) मधील सर्वोत्तम फोटोंचे अनावरण केले . या चॅलेंजमधील जगभरातून दहा छायाचित्रे निवडण्यात आली होती. या दहा फोटोंमध्ये कोल्हापुरच्या प्रज्ज्वल चोैगुले या हौशी फोटोग्राफरच्या फोटोचा समावेश आहे.

जगात भारी, आम्ही कोल्हापुरी 

नुकताचं अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’ (Apple shot on iPhone micro challange) मधील सर्वोत्तम फोटोंचे अनावरण केले आहे. यामध्ये जगभरातून असंख्य फोटो आले होते. यातील १० फोटोंची निवड करण्यात आली होती. या १० फोटोंमध्ये कोल्हापुरातील हौशी फोटोेग्राफर असलेल्या प्रज्ज्वल फोटोचा समावेश केला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातून निवड होणारा प्रज्ज्वल हा एकमेव आहे.

अ‍ॅपल शॉट ऑन आयफोन मॅक्रो चॅलेंज’
 
२५ जानेवारी २०२२ रोजी  अ‍ॅपल कंपनीने फोटो पाठवण्यास आव्हान केले होते. अ‍ॅपल iPhone 13 प्रो किंवा iPhone 13 प्रो मॅक्स  वापरून मॅक्रो चित्र कॅप्चर करण्याची अट होती. १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फोटो स्वीकारण्यात आले होते. पहिल्या १० मध्ये चीन, हंगेरी, इटली, स्पेन, थायलंड आणि अमेरिकेसह इतर नऊ विजेत्यांमध्ये प्रज्ज्वलचाही समावेश झाला आहे. हे फोटो Apple.com वर, Apple च्या इन्स्टाग्रामवर (@apple)  पब्लिश केले गेले. प्रज्ज्वलचा निवडण्यात आलेला फोटो हा कोष्ट्याच्या जाळ्यावर पडलेल्या दवबिंदुंचा  आहे.

चित्रकलेतून फोटोग्राफीची आवड 

कोल्हापुरातील प्रतिभानगरात राहत असलेल्या प्रज्ज्वलला लहानपणापासून चित्रकलेची आवड. त्‍याला चित्रातून गोष्ट सांगण्यात रस आहे. आई-वडिलांच्या कौतुकापासून नॅशनल जिऑग्राफीच्या ‘डेली डझन’ वेबसाईटवर फोटो प्रर्दशित होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास घडला. प्रज्ज्वल मेकॅनिकल इंजिनियर आहे. चित्रकलेच्या आवडीतून त्याला फोटोग्राफीची निर्माण झाली. घराच्या परसबागेतून त्याच्या फोटोग्राफीच्या प्रवासाला सुरु झाली. त्याने मोबाईलच्या मदतीने फोटोग्राफीला सुरुवात केली. याआधी प्रज्ज्वलचे नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरी, कॅनॉन, बीबीसी अर्थ, सीएनएन क्रियेट, असियन फोटोग्राफी या ठिकाणी त्याचे फोटो पब्लिश झाले आहेत.

Back to top button