मनोरंजन

deepika Pathaan movie : ‘पठाण’ मधील दीपिकाचा पहिला लूक रिलीज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : यशराज फिल्म्सने बहुप्रतीक्षित 'पठाण' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज केले आहे. (deepika Pathaan movie ) दीपिका पदुकोणचा कधीही न पाहिलेला अवतार या पोस्टरमध्ये दिसत आहे. कॅमेऱ्यासमोर दीपिका बंदूक हातात घेऊन शूटिंग करताना दिसत आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात दीपिकाशिवाय शाहरुख खान आणि जॉन अब्राहमदेखील मुख्य भूमिकेत आहेत. पुढील वर्षी २५ जानेवारीला हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत रिलीज होणार आहे. (deepika Pathaan movie )

सोशल मीडियावर मोशन पोस्टर रिलीज करताना दीपिका पदुकोणने लिहिले, Tadaa!? #Pathaan. हा चित्रपट २५ जानेवारीला हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता शाहरुख खानने दीपिका पदुकोणचा लूक शेअर करत लिहिले की, "तिला मारण्यासाठी गोळीची गरज नाही."

पठाणमधील दीपिका पदुकोणच्या भूमिकेबद्दल बोलताना, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद म्हणतात, "दीपिका पदुकोण ही एक मोठी स्टार आहे आणि तिची 'पठाण'मधील उपस्थिती आमचा चित्रपट आणखी रोमांचक आणि भव्य बनवते. आज आम्ही आमचा ॲक्शन थ्रिलर चित्रपट सादर करणार आहोत. चित्रपटातून तिची झलक सादर करण्यासाठी. दीपिकाची या चित्रपटात दमदार भूमिका आहे जी सर्वांचेच होश उडवून देईल."

पठाण चित्रपटात शाहरुख खान

शाहरुख खानने सोशल मीडियावर मोशन पोस्टर शेअर केले आणि लिहिले, '३० वर्षे…. तुमचे प्रेम आणि स्मित असीम आहे. आता 'पठाण'बद्दल बोलूया. हा चित्रपट २५ जानेवारी, २०२३ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

हेदेखील वाचा-

SCROLL FOR NEXT