सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव संगीत महोत्सवाची सांगता | पुढारी

सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव संगीत महोत्सवाची सांगता

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार संगीत नाटक अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने सुरू असलेल्या सुंद्रीसम्राट संगीत महोत्सवाची सांगता झाली. दुसर्‍या सत्रात कलाकार पंडित सदाशिव कोरवी यांनी सनई वादनात राग बैरागी भैरवचे सादरीकरण केले.
अलाप, मूर्खी, तान अशा वेगवेगळ्या पद्धतीने तराना वाजून मिश्र धूनमध्ये त्यांनी काफी पिलू खमाज राग-सादर केला. त्यांना पंडित मनमोहन कुंभारे यांची तबलाची साथ लाभली. त्या पाठोपाठ बनारसच्या युवा गायिका तेजस्विनी वेरनेकर यांचे शास्त्रीय गायन झाले. त्या गायनामध्ये राग आलिया बिलावल सादर केले. त्यामध्ये आलाप, मूर्खिया, तान अशा वेगवेगळ्या पद्धतीने विलंबित एक ताल मध्ये सादर केले व मध्य तीन ताल मध्ये एक छोटा ख्याल सादर केला.

संत कबीरदास यांचे मीरा भजनात ललित राग, ललत पंचम, मियागी तोडी गुजराती, देसी तोडी अशा विविध प्रकारच्या रागांचे मिश्रण करून या महोत्सवात आपली स्वतःची ओळख गायनाच्या माध्यमातून करून घेतली. त्यांना तबल्याची साथ पंडित मनमोहन कुंभारे तर संवादिनी साथ राजकुमार सावळगी यांनी दिली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतरंग वादक पंडित मिलिंद तूळणकर यांचे जलतरंग वादन झाले. त्यामध्ये आझादी का अमृत महोत्सवच्या अंतर्गत कार्यक्रम चालू असलेल्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेक्षकास समवेत ‘सारे जहाँ से अच्छा’ ही धून सादर करून प्रेक्षकांनाही गायला लावले.

त्यापाठोपाठ मिया की तोडी हा राग सादर केला. त्यामध्ये जोड झाला तंतकारी अशा अनेक पद्धतीने राग सादर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना तबल्याची साथ गणेश तानवडे यांनी केली. त्यापाठोपाठ श्रीनिवास काटवे, अंबिका काटवे यांच्या गुरु शिष्य माध्यमातून पारंपारिक कला सादरीकरण करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या नृत्यांमध्ये अनेक भाव मुद्रांनी प्रेक्षकांना मोहून टाकले. हा महोत्सव पूर्ण होण्याकरिता गायत्री जाधव, अलका गुरव, राम जेऊरकर, ऋषिकेश नागावकर, लक्ष्मण जाधव, सोमनाथ जाधव, शंकर जाधव, अनिल जाधव, जगदीश पाटील यांनी अथक प्रयत्न करून संगीत महोत्सव पार पाडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कलढोणे यांनी केले.

Back to top button