मनोरंजन

लैंगिक शोषण प्रकरणी गणेश आचार्य विरोधात आरोपपत्र दाखल

स्वालिया न. शिकलगार

मुंबई : पुढारी ऑनलाईन

लैंगिक शोषण, पिच्छा करणे असे आरोप झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी आता कोरियोग्राफर गणेश आचार्य विरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. २०२० मध्ये यांच्या को-डान्सरने दाखल केलेल्या तक्रारीनंतर अनेक कलमांखाली हे आरोपपत्र दाखल केले आहे. एका इंग्रजी वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात नुकतेच आरोपपत्र दाखल करण्यात आले. हे प्रकरण मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यातील आहे.

बॉलिवूड कोरिओग्राफर आचार्य यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या वकिलांनी सांगितले की, "मला आरोपपत्र मिळालेले नाही त्यामुळे मी काहीही सांगू शकत नाही. परंतु एफआयआरमधील सर्व कलमे जामीनपात्र आहेत."

को-डान्सरने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने कोरिओग्राफर म्हणून काम करताना तिने लैंगिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. तिने आचार्यवर तिचा विनयभंग करणे, अश्लील कमेंट करणे आणि अश्लील व्हिडिओ दाखविल्याचा आरोप केला आहे. पण, आचार्यने तिचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

को-डान्सर महिलेने आचार्यच्या सहाय्यकांवरही मारहाणीचा आरोप केला आहे. महिलेने खुलासा केला की, 'जेव्हा मी आचार्यच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा महिला सहाय्यकांनी मला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि माझी बदनामी केली. त्यानंतर मी पोलिसांकडे गेले. त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला आणि फक्त एकच अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. मग हे प्रकरण पुढे नेण्यासाठी मी वकिलाशी संपर्क साधला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT