पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी सदस्यांवर "वाजवा रे वाजवा" कॅप्टन्सी कार्य सोपवले होते. कार्यादरम्यान शाब्दिक चकमक, वादावादी, भांडणं, मारामारी हे आपण बघत आलो आहोत. सदस्यांना बऱ्याचदा त्यांच्या रागावर नियंत्रण राहत नाही. ते असे काही करून बसतात की, नंतर त्यांना त्या गोष्टीचे वाईट वाटते. असेच काहीसे आज घरामध्ये होणार आहे. इतर सदस्यांशी वाद घालताना योगेशचा राग अनावर झाला आणि मेघाताई आणि योगेशमध्ये कार्या दरम्यान वादावादी झाली.
मेघा ताई म्हणाल्या, "अरे तुझं डोकं गुडघ्यात…दोन्ही गुडघ्यात आहे ते सांभाळून ठेव मेंदू तुझा. यावर योगेशने एक शब्द खाली पडू नाही दिला. त्यानेही उत्तर दिले. अपूर्वा म्हणाली, याचे जेवढे वय नाहीये ना तितकं तिचं करिअर आहे. सदस्यांनी योगेशला शांत करण्याचा प्रयत्न केला. पण बघूया पुढे काय झालं आजच्या भागामध्ये.