

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची सुटका करण्यासंदर्भातील नव्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने तयारी दर्शवली आहे. याबाबत काही याचिका आधीपासूनच प्रलंबित आहेत. त्या याचिकांसोबत नव्या याचिकेची सुनावणी घेतली जाईल, असे न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
सन 2002 मध्ये गुजरात दंगलीवेळी बिल्कीस बानोवर सामुहिक बलात्कार झाला होता तर तिच्या कुटुंबातील काही लोकांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 11 दोषींना मुदतीआधी गुजरात सरकारने तुरुंगातून सोडले होते. माकप नेत्या सुहासिनी हैदर तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी याला आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या आहेत. दरम्यान नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन नावाच्या संघटनेने दोषींना सोडण्यास आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे. सदर प्रकरणी गुजरात सरकारने अलिकडेच आपले उत्तर खंडपीठासमोर सादर केले होते.
हेही वाचलंत का ?