Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेत असूनही शेअर बाजार सावरला, हिरव्या चिन्ह्यात बंद | पुढारी

Stock Market Updates | कमकुवत जागतिक संकेत असूनही शेअर बाजार सावरला, हिरव्या चिन्ह्यात बंद

Stock Market Updates : कमकुवत जागतिक संकेत आहे. पण यातून भारतीय शेअर बाजार सावरताना दिसत आहे. आशियाई बाजारात घसरण झाली आहे. पण भारतीय शेअर बाजारात याचे पडसाद दिसून आले नाहीत. शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे २०० अंकांनी वाढून ५९,४०० वर खुला झाला. तर निफ्टी ६४ अंकांनी वधारून १७,६०० वर होता. त्यानंतर ही तेजी कमी होऊन सेन्सेक्स १०४ अंकांच्या वाढीसह ५९,३०७ वर बंद झाला. तर निफ्टीही १२ अंकांच्या किरकोळ वाढीसह १७,५७६ वर बंद झाला.

ॲक्सिस बँकेचे शेअर्स ९.३३ टक्क्यांनी वधारले

सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीत ॲक्सिस बँकेने निव्वळ नफ्यात ७० टक्के वार्षिक (YoY) वाढ नोंदवली. त्यानंतर आज शुक्रवारी ॲक्सिस बँकेचे शेअर्स त्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले. ॲक्सिस बँकेच्या शेअर बीएसईवर ५.७७ टक्क्यांनी वाढून ८७९.९५ रुपयांवर पोहोचले. बँकेच्या एकूण ५.१५ लाख समभागांनी बीएसईवर ४४.६९ कोटी रुपयांची उलाढाल केली. बीएसईवर आज बँकेचे मार्केट कॅप २.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. ॲक्सिस बँकेच्या शेअरमध्ये एका वर्षात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका आठवड्यात हे शेअर ९.३३ टक्क्यांनी वधारले आहेत.

आशियाई शेअर्स शुक्रवारी घसरले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून आणखी व्याजदर वाढीची शक्यता आणि मंदीच्या जोखमीने गुंतवणूकदारांच्या भावना दुखावल्या आहे. यामुळे आशियाई बाजारात घसरण झाली आहे. शुक्रवारी सिंगापूर एक्सचेंजवरील निफ्टी फ्यूचर्स ९.५ अंक म्हणजेच ०.०५ टक्क्यांनी घसरून १७,५१० वर आला. तर टोकियोचे शेअर्स शुक्रवारी घसरले. बेंचमार्क Nikkei २२५ निर्देशांक सुरुवातीच्या व्यवहारात ०.३७ टक्के म्हणजेच १०१ अंकांनी घसरून २६,९०५ वर आला. तर Topix निर्देशांक ८.३७ अंकांनी खाली येऊन १,८८७ वर व्यवहार करत होता.

दरम्यान, गुरुवारी सेन्सेक्स ९५ अंकांच्या वाढीसह ५९,२०२ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५१ अंकांनी वाढून १७,५६३ वर बंद झाला होता. (Stock Market Updates)

शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमती स्थिर होत्या. चीन हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागांत लॉकडाऊन आहे. यामुळे चीनमधून तेलाची आयात कमी झाली आहे.

हे ही वाचा :

Back to top button