मुंबई; पुढारी ऑनलाईन :
बिग बॉस मराठी सिझन तिसरा ( BBM ) सुरू झालाय. काही दिवसातच घरातील काही सदस्य एका ग्रुपमध्ये तर काही सदस्य दुसर्या ग्रुपमध्ये दिसून आले. काही सदस्य नक्की कुठल्या ग्रुपमध्ये हे काही कळत नव्हतं; पण जसजसे दिवस पुढे जात आहेत, आता ते स्पष्ट होते आहे.
मीनल, आविष्कार, विशाल आणि सोनालीला विकास सांगताना दिसणार आहे. मला तुम्हाला उत्कर्षबद्दलचं माझं दिवसभरातला observation सांगायच आहे. पहिला टास्क जेव्हा आला ना तेव्हा त्याचं असं होतं मी त्यांची मडकी फोडणार. मला असं वाटलं त्याचा destruction वर जास्त भर आहे नाही की काहीतरी क्रिएट करण्यावर. त्याने हे प्लॅन केलंचं नाही की आपली मडकी कशी वाचवता येतील. मी जाऊन त्यांची मडकी फोडणार इतकचं त्याच म्हणणं होतं.
दुसरी गोष्ट तो खूप बडबड करतो मी असं करेन. तसं करेन. मला महेशसर देखील म्हणाले ना मी हुशार आहे उगीच नाही बोले. बघ मी काय करतो असं तो तृप्तीताईंना सांगत होता. खरं सांगायच ना तर उत्कर्ष "बोलबच्चन" आहे त्याची मेंटल, Physical capability काही नाहीये. आता यावरून विकास पाटील आणि उत्कर्ष यांच्यात वाद होणार का? याबाबत उत्सुकता आहे.
काल बिग बॉस ( BBM ) मराठीच्या घरामध्ये एक टास्क रंगला. त्यासाठी बिग बॉस यांनी दोन ग्रुप घोषित केले. त्याच टास्क संदर्भात आज विकास आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसणार आहे. आज घरामध्ये काय काय होणार ? कोणतं नवं आव्हान बिग बॉस सदस्यांसमोर उभ रहाणार ? बघूया आजच्या भागामध्ये.
आज बिग बॉस सदस्यांना काही कोडी देणार आहेत. त्यांना ते शोधायचे आहे नक्की काय आहे टास्क कळेलच आज. तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.