एक थी बेगम : बंदूक हातात घेतल्यानंतर दडपण आलं : अनुजा साठे | पुढारी

एक थी बेगम : बंदूक हातात घेतल्यानंतर दडपण आलं : अनुजा साठे

पुढारी ऑनलाईन :

हातात खरी बंदूक घेऊन चालवणे. हे किती भीतीदायक असू शकते, याची आपल्याला तितकीशी कल्पना नाही. अनेक देशभक्ती किंवा गँगवॉरवर आधारित चित्रपटांमध्ये आपण गोळीबार पाहिलाय. एमएक्स प्लेअर ओरिजनलच्या ‘एक थी बेगम २’ या वेबसिरीजची अभिनेत्री अनुजा साठे देखील गोळीबार करताना दिसली. अनुजा साठे हिने पडद्यावर अतिशय सहजरित्या बंदूक हाताळली आहे. अर्थात त्यासाठी तिने प्रशिक्षण घेतले.

anuja sathe
अनुजा साठे

आपण गुंडांना किंवा दहशतवाद्यांना अगदी सहजरित्या गोळीबार करताना पाहिलंय. रक्तपात घडवताना पाहतो. ते पाहण्यात आपण इतके तल्लीन होऊन जातो की, ते सर्व खोटे आहे हेही आपण पूर्णपणे विसरतो. इतक्या कौशल्याने हे चित्रित केले जाते.

anuja sathe
एक थी बेगम-२ : अनुजा साठे हिने शेअर केले अनुभव

बंदूक हाताळण्याच्या अनुभवाबद्दल अनुजा म्हणते-

आयुष्यात पहिल्यांदा हातात जेव्हा मी बंदूक घेतली होती तेव्हा माझ्या अंगावर शहारे आले होते. ही अजिबात अतिशयोक्ती नाही. ‘एक थी बेगम २’ मधील माझी भूमिकेची गरज म्हणून मी बंदूक हाताळली. तो अनुभव खूपच दडपण आणणारा आणि भीतीदायक होता. परंतु जेव्हा तुम्ही सूडाच्या भावनेने जेव्हा पेटलेले असता, तेव्हा हे सर्व नगण्य होऊन जाते. शूटिंगच्या सेटवर बंदूक चालवण्याअगोदर मी प्रशिक्षण घेतले होते, ज्याचा मला निश्चितच फायदा झाला.’

एक थी बेगमच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने सुरु होते. मृत्यूचे सोंग घेतलेली अशरफ दुबईचा डॉन मकसूद (अजय गेही) ला संपवण्याच्या आपल्या ध्येयाच्या दिशेने झेपावते. आपला पती झहीरच्या(अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या आपल्या प्रतिज्ञेवर ती ठाम राहते.

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित ‘एक थी बेगम’च्या दुसऱ्या सीझनमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसाटकर यांच्या भूमिका होत्या. नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णानदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

एमएक्स प्लेअर ओरिजनलची ‘एक थी बेगम २’ प्रेक्षकांना ३० सप्टेंबरपासून विनामूल्य पाहता येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anuja Sathe (@anujasatheofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Anuja Sathe (@anujasatheofficial)

Back to top button