मनोरंजन

Sanah Kapoor Wedding : शाहिदच्या बहिणीच्या लग्नात मीरा रजपूतचा नखरा

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची बहीण सना कपूर (Sanah Kapoor Wedding ) नुकतीच मयंक पाहवा याच्याशी लग्न बंधनात अडकली. या विवाहसोहळ्यातील काही खास फोटो शाहिदने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, शाहिदची पत्नी मीरा रजपूतवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या.

सना कपूर आणि मयंक यांचा विवाह सोहळा ( Sanah Kapoor Wedding ) महाबळेश्वरमध्ये मोठ्या थाटामाटाने पार पडला. या विवाहाला सर्व कपूर कुटुंबियानी हजेरी लावली. लग्नात सना कपूरने निळ्या रंगाचा लेहंगा आणि लाल रंगाची चोळी परिधान केली होती. तर मयंकने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. लग्नामध्ये नववधू खूपच सजलेल्या आणि नटलेल्या दिसतात. परंतु, सनाने यावेळी सिंपल लूक केला होता. तर दोघेही या लूकमध्ये सुंदर दिसत होते.

याच दरम्यान शाहिदची पत्नी मीरा रजपूतवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या. सना म्हणजे, नंनदेच्या लग्नात मीरा खूपच ग्लॅमरस दिसत होती. यावेळी मीराने पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली होती. तर शाहिदने काळ्या रंगाच्या कुर्ता आणि पायजमासह हटके स्टाईलमध्ये दिसला. हे कपल विवाहात आकर्षणाचा केंद्रबिदू ठरले.

या विवाहाचा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड स्टार्सनी नवीन जोडप्याला भरभरून आशिर्वाद दिले आहेत. याच दरम्यान पाठवणीच्यावेळी शाहिद कपूर भावूक होत एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने 'वेळ कसा निघून गेला मला समजले नाही. माझी बहीण आता नववधू बनली आहे. माझी बहीण मोठी झाली आहे. या नवीन आणि भावी आयुष्यासाठी तिचे अभिनंदन करतो.' असे म्हटले आहे.

कोण आहेत सना कपूरचे सासू-सासरे?

सना कपूरचा पती मयंक पाहवा हा बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मनोज पाहवा आणि सीमा पाहवा यांचा मुलगा आहे. मनोज पाहवा यांना सलमान खानच्या 'वॉन्टेड', 'रेडी' आणि 'सिंह इज किंग' या चित्रपटांसह अनेक उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जाते. तर सीमा पाहवाला 'गंगूबाई काठियावाडी', 'शुभ मंगल ‍‍यादा सावधान', 'बधाई दो' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत काम केले आहे. मनोज आणि सीमा यांना दोन मुले असून मुलीचे नाव मनुकृती पाहवा असे आहे. सना कपूरबद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेता आणि दिग्दर्शक पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी आहे. शाहिद कपूर आणि ईशान खट्टर हे सना कपूरचे सावत्र भाऊ आहेत.

पंकज कपूर आणि मनोज पाहवा अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी २००१ मध्ये 'ऑफिस ऑफिस' शोमध्ये आणि 'चला मुसद्दी ऑफिस- ऑफिस' या चित्रपटातही दोघे एकत्रित दिसले होते. याशिवाय पंकज कपूर दिग्दर्शित 'मौसम' या चित्रपटातही मनोज पाहवाने मुख्य भूमिका साकारली होती. पंकज कपूर व्यतिरिक्त मनोज पाहवाने ईशान खट्टरसोबत टीव्ही मालिका 'अ सूटेबल बॉय'मध्येही काम केले होते. पंकज आणि मनोज यांनी त्यांच्या अनेक वर्षांच्या मैत्रीचे रूपांतर आता नात्यात केले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT