पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची (Aishwarya Rai Bachchan) मुख्य भूमिका असणारा आगामी 'पोन्नियन सेलवन-1' (Ponniyin Selvan-१) हा चित्रपट लवकरच चाहत्याच्या भेटीस येत आहे. सध्या या चित्रपटातील ऐश्वर्याच्या फर्स्ट लूकसोबत चित्रपटाची रिलीज डेटचा घोषणा करण्यात आली आहे.
ऐश्वर्या रायच्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच 'पोन्नियन सेलवन-1' ( Ponniyin Selvan-१ ) या चित्रपटातील तिचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत ऐश्वर्या धाडसी मुलगी आणि महाराणीच्या वेशभूषेत दिसून येत आहे. यावेळी तिने साजेशीर दागिन्यासोबत चॉकलेटी रंगाच्या साडी परिधान केली आहे. ऐश्वर्याच्या हा लूक सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.
ऐश्वर्यासोबत विक्रम, जयम रवी, कार्ती आणि शोभिता धुलिपाला यांचा ही फर्स्ट लूक समोर आला आहे. परंतु, सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि शोभिता याच्या लूकचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्याने लिहिले आहे की, 'हे सोनेरी पर्व ३० सप्टेंबर २०२२ रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.' या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने नंदिनीची मुख्य भूमिका साकारली आहे.' यावरून 'पोन्नियन सेलवन-1' हा चित्रपट येत्या ३० सप्टेंबर २०२२ रोजा थिअटरमध्ये चाहत्यांच्या भेटीस येत असल्याचे समजते.
या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत विक्रम, जयम रवी , कार्ती आणि शोभिता धुलिपाला यांनीही भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे. हा चित्रपट दोन पार्टमध्ये तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रपट कल्कि यांच्या तमिळ कादंबरीवर आधारित असणार आहे. या चित्रपटाची लाइका प्रोडक्शन आणि मद्रास टॉकीज यांनी निर्मिती केली आहे.
'पोन्नियन सेलवन-1' हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, चित्रपटाचे बजेट ५०० कोटींचे असल्याचे समजते. मध्य प्रदेश आणि दक्षिण भारतातील काही भागांमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. यामुळे चाहत्यांना चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?