Marilyn Monroe 
मनोरंजन

Marilyn Monroe : मर्लिनच्या ‘ब्लाँड’चा ट्रेलर रिलीज; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाशी होतं अफेअर

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क: हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मुनरोचे (Marilyn Monroe) जीवनावर आधारित चित्रपट लवकरच येत आहे. या चित्रपटाचे नाव 'ब्लाँड' असे असून नुकतेत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. परंतु, दिग्गज अभिनेत्री मर्लिनचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्याशी अफेयर असल्याचे वृत्त समोर आलं होतं. तर चित्रपटात अभिनेत्री अ‍ॅना डी अर्मास हिने मर्लिनची मुख्य भूमिका साकारली आहे.

जॉईस कॅरोल ओट्स यांनी लिहिलेल्या 'ब्लॉन्ड' या कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. नुकताच चित्रपटाचा २ मिनिटे ९ सेंकदाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. यात मर्लिन याच्या करिअरमधील डार्क साईड दाखविण्यात आली आहे. मर्लिनची नवी फॅशन ट्रेंड, तिच्या आयुष्यातील चढ-उतार, मृत्यूचं गूढ, असे अनेक गोष्टीचा उलघडा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये 'मर्लिन या जगात नाहीच मुळी… कॅमेरा बंद झाला की, फक्त नॉर्मा जीन मागे उरले,' असे बोलले जात आहे. हा ट्रेलर चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे. ट्रेलरसोबत अ‍ॅनाचा मर्लिन मन्‍रो चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे.

'ब्लाँड' हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. तर व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये ३१ ऑगस्ट ते १० सप्टेंबरमध्ये चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. मर्लिन ही जगातील एक सुंदर महिला म्हणून ओळखली जात होती. मर्लिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची भेट एका संभारंभात झाली होती. यानंतर दोघांच्यात अफेयर असल्याचे वृत्त समोर आलं होत.

मर्लिनने बारा वर्षांच्या चित्रपट करिअरमध्ये तब्बल ३३ चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी तिचा झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाल्याने मृत्यू झाला होता. परंतु, या मृत्यू मागचे नेमके कारण आजही जगासमोर येऊ शकलेले नाही. मर्लिनने आत्महत्या केली की तिचा खून झाला? याचे रहस्य अजून गुलदस्तात आहे. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT