sonam kapoor and anand ahuja  
Latest

Sonam Kapoor Pregnancy : बॉलिवूडच्या मस्सकलीनं दिली गुड न्यूज

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूड मस्सकली अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी गुड न्यूज दिली आहे. ते आता बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. अभिनेत्री आणि तिच्या पतीने आपल्या चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केलीय. तिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. ही गोड बातमी तिने आजच शेअर केली आहे. तिने आपल्या पतीसोबत काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ते बाळाच्या स्वागतासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. (Sonam Kapoor Pregnancy)

तिने इन्स्टाग्रामवर कॅप्शन शेअर करताना म्हटलं आहे- Four hands. To raise you the very best we can. Two hearts. That will beat in unison with yours, every step of the way. One family. Who will shower you with love and support. We can't wait to welcome you. ❤️❤️❤️ #everydayphenomenal #comingthisfall2022.

या पोस्टवर जान्हवी कपूर, मलायका अरोरा, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, अनन्या पांडे, अंशुला कपूरने तिचे अभिनंदन केले आहे.

काही महिन्यांपासून सोनम ही लाईमलाईटपासून दूर आहे. अनेक कार्यक्रम आणि पार्टीमध्येही ती फारशी दिसलेली नाही. पण, १ तासांपूर्वी तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी दिलीय.

सोनमने पतीसोबत प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये सोनम काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आनंदच्या मांडीवर डोके ठेऊन झोपलेली दिसत आहे. फोटोंमध्ये सोनमचा बेबी बंपही दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत सोनमने लिहिले, 'तुमचे उत्तम संगोपन करण्यासाठी आमचे चार हात. २ हृदय. जी प्रत्येक पायरीवर आणि मार्गावर तुझ्यासोबत धडधडतील. एक कुटुंब जे तुमच्यावर प्रेम आणि पाठिंबा देईल. आम्ही तुझे स्वागत करण्यासाठी थांबू शकत नाही.'

सोनम आणि आनंदचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. तेव्हापासून सोनमच्या चाहत्यांना या गुड न्यूजची अपेक्षा होती. सोनम सध्या पतीसोबत लंडनमध्ये राहते. कामाच्या आघाडीवर, सोनम शोम माखिजा दिग्दर्शित चित्रपट ब्लाइंडमध्ये दिसणार आहे. हा २०११ च्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे, ज्यात एका कार अपघातात एका महिलेने आपले डोळे गमावले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT