Samantha : सामंथा रूथ प्रभू करणार धोकादायक अ‍ॅक्शन | पुढारी

Samantha : सामंथा रूथ प्रभू करणार धोकादायक अ‍ॅक्शन

नवी दिल्ली : लोकप्रिय दक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आपल्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटात अत्यंत धोकादायक अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. सामंथाला अ‍ॅक्शन ट्रेनिंग देण्यासाठी हॉलीवूडचे प्रसिद्ध स्टंटमन यानिक बेन यांना आणण्यात आले आहे. यापूर्वी सामंथाने यानिकसोबत ‘द फॅमिली मॅन-2’ या लोकप्रिय वेबसीरिजसाठी काम केले होते.

‘यशोदा’ या चित्रपटात सामंथा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यानिक बेनसोबत पुन्हा काम करावयास मिळणार असल्याने ती उत्साही बनली आहे. तिने यानिकसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हरी-हरिष ही लोकप्रिय जोडी ‘यशोदा’चे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाकडून सामंथाला मोठी अपेक्षा आहे. यशोदा हा एक थ्रिलर चित्रपट असून त्याचे एकूण बजेट 30 कोटी असल्याचे समजते.

हेही वाचलत का ?

Back to top button