shweta shinde  
Latest

Shweta Shinde : श्वेताची क्रिम कलर साडी अन् लांबलचक मंगळसूत्र

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्वेता शिंदे (Shweta Shinde) ही मराठीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. ती एक उत्तम निर्मातीदेखील आहे. निर्मिती क्षेत्रात तिने अनेक मालिकांची निर्मिती केली आणि त्या मालिका प्रसिद्धही झाल्या. देवमाणूस, लागिरं झालं जी यासारख्या मालिकांची निर्मिती करून श्वेताने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या श्वेता चर्चेत आलीये ते म्हणजे तिचा दिवाळी स्पेशल लूक. तिने काही सुंदर फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Shweta Shinde)

श्वेताने क्रिम कलरची सुंदर साडी नेसलीय. त्यावर बनारसी हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातलाय. तिचे मंगळसूत्र लक्ष वेधून घेणारं आहे. सुंदर हेअर स्टाईल, हटके ईअररिंग्जने सर्वांना मोहून टाकलंय.

डॉक्टर डॉन या मालिकेसाठीही ती ओळखली जाते. तिने २०१६ मध्ये चित्रपट दिग्दर्शक संजय खांबे यांच्यासोबत वज्र प्रॉडक्शन सुरू केले होते. तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि नंतर ती चित्रपट आणि डेली सोपमध्ये अभिनयासाठी गेली. श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य', 'वादळवाट' यासारख्या मराठी मालिका केल्या. या मालिका गाजल्याही. 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकाचीही श्वेताने यशस्वी निर्मिती केली.

श्वेताने अभिनेता संदीप भन्साळीशी लग्न केलं आहे. त्यांची कन्या 'वामिका' हीदेखील श्वेतासारखीच सुंदर आहे.

कपल लव्हस्टोरी

अनेक कलाकारांसारखी श्वेता आणि संदीप यांचीही लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे. या कपलची पहिली भेट कशी झाली तुम्हाला माहिती का? श्वेता आणि संदीप यांची पहिली भेट शूटिंगच्या सेटवर झाली होती. पहिल्याच भेटीत त्यांचं भांडण झालं. जोरदार भांडण होऊनही संदीपने श्वेताचा वाढदिवस साजरा केला. त्याने केक आणला आणि सेटवर सेलिब्रेशन केलं. श्वेताला याविषयी काहीच माहिती नव्हती. तिलाही आनंद झाला आणि आश्चर्यही वाटलं. संदीपने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं भांडण मिटलं. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT