Diwali Padwa 2022 : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिवाळी पाडव्यानिमित्त फुलांची आरास (फोटोज)

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सजावट

पुढारी ऑनलाईन : दिवाळी पाडवा व भाऊबीजनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात व सोळखांबी व सभामंडप येथे पिवळ्या व केसरी झेंडूच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे 1000 किलो पाना फुलांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात करण्यात आली आहे. यामुळे मंदिराचे स्वरुप नयमरम्य दिसत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून ही मनमोहक आरास पाहून समाधान व्यक्त केले जात आहे.

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने श्रींच्या मंदिरात, सोळखांबी, सभामंडप येथे पाना फुलांची आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते. त्यानुसार आज पाडवा व भाऊबीज निमित्ताने मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली आहे.

पाडवा व भाऊबीजनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप

श्रींच्या मंदिरात, सोळखांबी, सभामंडप येथे पाना फुलांची आरास

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध सण, उत्सव काळात रंगीगेरंगी फुलांचा वापर करुन सजावट केली जाते.

श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे हे सजलेले अनोखो रुप पाहण्यासाठी श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची  गर्दी

श्रींच्या मनमोहक आरासीचे दर्शन

रुक्मिणी मातेचे मनमोहक आरासीचे दर्शन 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news