Latest

औरंगाबाद नामांतराच्या स्थगितीविरोधात शिवसेनेचे शनिवारी आंदोलन

अविनाश सुतार

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा :  महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करून या प्रस्तावास मंजुरी दिली होती. परंतु शिंदे, फडणवीस सरकारने संभाजीनगर नामांतराला स्थगिती देऊन विरोध दर्शविला आहे. या स्थगिती निर्णयाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.१६) सकाळी १० वाजता छत्रपती संभाजी महाराज पुतळा, टीव्ही सेंटर चौकात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, तसेच समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर यांनी केले आहे.

यावेळी बप्पा दळवी, जयवंत ओक, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, सुशील खेडकर,महिला आघाडीच्या संपर्क संघटिका सुनिता आऊलवार, सुनिता देव, जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटिका अनिता मंत्री, अंजली मांडवकर, मीना फसाटे, नलिनी बाहेती, जयश्री लुंगारे, दुर्गा भाटी, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, शहर संघटिका प्राजक्ता राजपूत आशा दातार, विद्या अग्निहोत्री, भागुअक्का शिरसाट विधानसभा संघटिका लक्ष्मी नरहिरे, मीरा देशपांडे, नलिनी महाजन, तालुका संघटिका जयश्री घाडगे उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT