Fadnavis VS Supriya Sule : राज ठाकरे यांच्या भेटीवरून फडणवीस-सुळे यांच्यात टोलेबाजी | पुढारी

Fadnavis VS Supriya Sule : राज ठाकरे यांच्या भेटीवरून फडणवीस-सुळे यांच्यात टोलेबाजी

पुढारी ऑनलाइन डेस्क : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस (Fadanvis VS Supriya Sule) यांच्यात परस्पर टोलेबाजी सुरू आहे. वाचा कोण-कोणाला काय म्हणाले…

Supriya Sule : राज ठाकरे यांची भेट घेतली म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला लगावला. त्या म्हणाल्या 105 आमदार असलेल्या पक्षाचा नेता फक्त एक आमदार असलेल्या पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतो.

Devendra Fadanvis : सुप्रिया सुळे यांच्या टोल्याला प्रत्यूत्तर देताना फडणवीस म्हणाले, राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. या काळात त्यांची भेट घेणे शक्य झाली नाही. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र आमच्या भेटीमुळे तुम्हाला मळमळायचं कारण काय असा टोला त्यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या निवासस्थानी फडणवीस यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. फडणवीस आणि ठाकरे यांच्यात तब्बल दीड तास चर्चा झाली. या चर्चेत नेमकी काय खलबते झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष पुढील राजकारणाकडे लागले आहे.

हे ही वाचा

 

Back to top button