Latest

वीज, कोळसाटंचाई हे तर नाटकच : गिरीश महाजन यांची टीका

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

राज्यात वीज आणि कोळशीची कृत्रीम  टंचाई करून जनतेच्या डोळ्यात अश्रु आणायचे मग ते पुसण्याचे नाटक करायचे, हा आघाडी सरकारचा डाव असून, जनतेने तो हाणून पाडला पाहिजे अशी बोचरी टीका भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. महाजन हे पुण्यात सोमवारी वैयक्तीक कामासाठी होते. त्यांनी भाजपच्या कार्यालयात पत्रकारांशी वीज, कोळसा टंचाई, राज ठाकरे यांची भूमिका, अशा विविध विषयावर त्यांनी मुक्त संवाद करीत आघाडी सरकारवर टीकेचे झोड उठवली.

महाजन म्हणाले की, राज्यात वीजेची टंचाई नसून, मागणी वाढली आहे. कारण उन्हाळा कडक आहे. शेतकऱ्यांना या कालावधीत पिकांना भरपूर पाणी लागते. तसेच सामान्य जनतेलाही भरपूर वीज लागते. मात्र आघाडी सरकार सहानुभुती मिळविण्यासाठी शेतकरी, सामान्य जनता आणि उद्योजकांचा छळ करीत आहे. ते कधी वीजेकडे तर कधी कोळसा टंचाईकडे बोट दाखवित आहेत. राज्य सरकारचे ढिसाळ नियोजनच यातून दिसते.

दलाली हाच एककलमी कार्यक्रम

चढ्या दराने वीज खरेदी करायची आणि त्यात दलाली मिळवायची हा आघाडी सरकारचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे. कोळशातही तेच सुरू आहे. कोळशाची टंचाई नसताना देखील 2 हजार मेगावॅटचे वीज केंद्र बंद करण्याचे नाटक सुरू आहे. राज्यात मुख्यमंत्री आहे की नाही असेच वाटत आहे. ते दोन महिन्यापासून मंत्रालयात फिरले देखील नाहीत.

अ‍ॅड. प्रविण चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा

महाजन यांनी राज ठाकरे यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नाला बगल देत सांगितले की, ते स्वतंत्र पक्षाचे असून, भोंग्याच्या निर्बंधांबाबत सर्वेच्च न्यायालाने नियमावली ठरवून दिलेली आहे. त्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला पाहिजे. अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये तुमच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांची नावे आहेत. या प्रश्नावर ते म्हणाले की, अ‍ॅड. चव्हाण हे महाआघाडी सरकारचे एजंट असून, ते खुले आम कटकारस्थाने करताना सर्वांनी पाहिले. त्यांमध्ये त्यांना अटक करून सीआयडी ऐवजी सीबीआय चौकशी केली पाहिजे.

खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे

राष्ट्रवादीतील जेष्ठ नेते एकनाथ खडसे सांगत आहेत, 'मीच गिरीष महाजनांना मोठे केले' या प्रश्नावर महाजन म्हणाले, खडसे यांच्या सोबत मी 25 वर्षे काम केले. लायकी नसताना पक्षाने तुम्हाला अनेकदा संधी दिली; पण सध्या त्यांची ताकद जळगाव जिल्ह्यतच नव्हे तर तालुक्यातूनही संपली आहे. साध्या ग्राम पंचायत सदस्यांना ते निवडून आणू शकत नाहीत सध्या त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते काहीही बोलत आहेत. मानसिक संतुलन बिघडलेल्या माणसावर परत काय बोलणार? त्यांचं मानसिक संतुलन अजून बिघडवायचं नाही. मला त्यांची काळजी आहे, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT