Mumbai Metro : मुंबई मेट्रोची वाहतूक सेवा विस्कळीत | पुढारी

Mumbai Metro : मुंबई मेट्रोची वाहतूक सेवा विस्कळीत

पुढारी ऑनलाईन डेस्क 

वर्सोव्याकडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई मेट्रोची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली आहे. गेल्या काही मिनिटांपासून ही वाहतूक विस्कळीत झाली असल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली.

एक ट्रेन एअर पोर्ट रोड मेट्रो स्टेशनवरून मागे घेण्यात आली आहे. त्याबद्दल मुंबई मेट्रोने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. मेट्रो सेवा लवकरच पूर्ववत होईल असे सांगण्यात आले आहे.

Back to top button