Latest

Sargam Koushal : मिसेस वर्ल्डचा पुरस्कार जिंकणारी सरगम कौशल आहे तरी कोण?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : सरगम कौशल ( Sargam Koushal ) हिने नुकतेच मिसेस पॉलिनेशियाला हरवत अमेरिकेत मिसेस वर्ल्डचा पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. तब्बल २१ वर्षानंतर मिसेस वर्ल्डचा मुकुट भारताला मिळाल्याने भारताची मान उंचावली आहे. परंतु, मिसेस वर्ल्डचा पुरस्कार मिळवणारी सरगम कौशल हिच्‍याविषयी जाणून घेवूया…

सरगम कौशलने अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत मिसेस वर्ल्ड २०२२ चा पुरस्कार जिंकत एक नवा इतिहास रचला आहे. यावेळी ग्रँड फिनालेसाठी तिने एक आकर्षक गुलाबी रंगाचा स्लिव्हलेस गाऊन परिधान केल्याने आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला. हा गाऊन भावना राव यांनी डिझाईन केला होता.

सरगमने मिसेस पॉलिनेशियाला हरवून मिसेस वर्ल्डच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरत मुकुटदेखील परिधान केला आहे. याआधी २००१ साली भारताच्या डॉ. अदिती गोवित्रीकरने मिसेस वर्ल्डचा पुरस्कार पटकावला होता. यानंतर २१ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताची मान उंचावत सरगमने हा किताब जिंकला. त्यामुळे सरगमवर सर्व स्तरातून भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोण आहे सरगम कौशल?

सरगम कौशल ही मूळची जम्मू-काश्मीरची आहे. सरगम व्यवसायाने एक मॉडेल आहे. ती विझाग येथे शिक्षिका म्हणून काम करत होती. तसेच सरगमचे लग्न २०१८ साली झाले असून, तिचे पती भारतीय नौदलात काम करतात. हा पुरस्कार जिंकल्याने सरगम अनेक सौदर्यवतींसाठी प्रेरणा स्थान बनली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT