FIFA World Cup 2022 closing ceremony : नोराचा फिफा समारोपात धमाकेदार परफॉर्मन्स, स्टेज दणाणून सोडले (video) | पुढारी

FIFA World Cup 2022 closing ceremony : नोराचा फिफा समारोपात धमाकेदार परफॉर्मन्स, स्टेज दणाणून सोडले (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने फिफा वर्ल्डकपच्या समारोप कार्यक्रमात (FIFA World Cup 2022 closing ceremony) तिच्या लाइव्ह आणि दमदार परफॉर्मन्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा नोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

(FIFA World Cup 2022 closing ceremony) फिफा विश्वचषक २०२२ चा फायनल सामना अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन संघात झाला. यात अर्जेंटिनाने तब्बल ३८ वर्षांनंतर फिफा विश्वचषकावर नाव कोरले. याच दरम्यान समारोप कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही हिने तिच्या धमाकेदार परफॉर्मन्सने स्टेज दणाणून सोडले. हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, दीपिका पादुकोण, नोरा फतेही, करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि कार्तिक आर्यनसह अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती.

यावेळी नोरा परदेशी कलाकार बाल्कीस, रहमा रियाद आणि मनाल यांच्यासोबत ‘लाइट द स्काय’ या गाण्यावर थिरकली. नोराचा मोकळ्या केसांच्या स्टाईलसोबत संपूर्ण ब्लॅक लूक चाहत्यांना खूपच आवडला. नोराचा लाइव्ह परफॉर्मन्स पाहून चाहत्यांनी भरभरून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. यात एका युजर्सने ‘समारोप समारंभात नोरा फतेहीला लाइव्ह डान्स करताना पाहून खूप आनंद झालाय, ‘नोरा फतेही आणि दीपिका पदुकोण या दोघी या फायनल सोहळ्याचे आकर्षण होत्या.’ असे म्हटले आहे. तर नोराने स्वत: तिच्या इंन्स्टाग्रामवर फिफा वर्ल्ड कपच्या समारोप सभारंभातील काही फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचलंत का? 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

Back to top button