जेम्स कॅमेरूनच्या ‘अवतार २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दीड हजार कोटींचा टप्पा पार | पुढारी

जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार २'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, दीड हजार कोटींचा टप्पा पार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘अवतार २’ हा हॉलिवूड चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने शुक्रवारी पहिल्या दिवशीच बंपर ओपनिंग करत भारतात ३८ ते ४० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सुट्टीच्या दिवशीदेखील चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढतच गेले. शेवटी ‘अवतार २’ चित्रपटाने जगभरात दीड हजार कोटींच्यावर कमाई केली आहे.

जेम्स कॅमेरूनच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ रिलीज होताच चाहत्यांनी थियटरमध्ये तोबा गर्दी केली. अवतार’ चा पहिला भाग २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर आता १३ वर्षानंतरही ‘अवतार २’ या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतात शुक्रवारी पहिल्या दिवशी ३८ ते ४० कोटी रुपयाचा, शनिवारी दुसऱ्या दिवशी ४५ कोटी, रविवारी तिसऱ्या दिवशी १३३ कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. ‘अवतार २’ने पहिल्या दोन दिवसांत १०० कोटींचा आकडा पार केला. तर रिपोर्टनुसार, या चित्रपटाने वीकेंडपर्यंत जगभरात दीड हजार कोटींच्यावर गल्ला जमवला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button