पुढारी ऑनलाईन डेस्क : "पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी-पाणी आक्रोश केला. म्हणून अटक केलं. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली. सरकार जनतेलाच घाबरु लागले! असं ट्विट करत खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. (Sanjay Raut)
अमरावती अकोला जिल्ह्यातील सुमारे ६९ गावांचा पाणी प्रश्न घेऊन ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख नागपुर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी मोर्चा घेवून जाणार होते. नितीन देशमुख जल संघर्ष यात्रा घेऊन नागपूरच्या सीमेवर दाखल झाले. मात्र पोलिसांनी तत्पूर्वीच त्यांची संघर्ष यात्रा मध्येच अडवली आहे. आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी-पाणी आक्रोश केला. म्हणून अटका केलं. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली. सरकार जनतेलाच घाबरु लागले! असं ट्विट करत खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
अमरावती अकोला जिल्ह्यातील सुमारे ६९ गावांचा पाणी प्रश्न घेऊन मोर्चाला सुरुवात केली. पाणी पिण्याच्या योग्यच नाही. मोठ्या प्रमाणावर लोक आजारी पडतात या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार देशमुख थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर गावागावातून गोळा केलेला पाण्याचा टँकर घेऊन जाणार होते. फडणवीस यांनी हे पाणी पिऊन दाखवावे अशी अफलातून अट त्यांनी ठेवली आहे. पालकमंत्री फडणवीस यांनी या सर्व गावांच्या नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करणार होते. तत्पूर्वीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा