Yemen Incident : येमेनमध्ये मोठी दुर्घटना; आर्थिक सहायता वितरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी; 85 जणांचा मृत्यू | पुढारी

Yemen Incident : येमेनमध्ये मोठी दुर्घटना; आर्थिक सहायता वितरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी; 85 जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाइन डेस्क : Yemen Incident : येमेन येथे बुधवारी रात्री उशीरा मोठी दुर्घटना घडली. आर्थिक सहायता वितरण कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन जवळपास 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. एएनआयने याची माहिती दिली आहे. सुरुवातीला मृतांचा आकडा 73 नंतर 78 होता. आता हाती आलेल्या अद्ययावात माहिती नुसार किमान 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक जखमी आहे. मयतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत येमेनच्या हाउती येथील एका विद्रोही संघटनेच्या अधिकाऱ्याने घटनेची माहिती दिली. तर हाउती द्वारा संचालित आंतरिक मंत्रालयानुसार घटनेच्या वेळी शेकडो गरीब लोक कार्यक्रमावेळी गोळा झाले होते. दरम्यान, हाऊतींनी मृतांच्या कुटुंबीयांना $2,000 आणि जखमींना $400 ची भरपाई जाहीर केली आहे.

आंतरिक मंत्रालयाचे प्रवक्ता ब्रिगेडियर अब्देल-खलीक अल-अघरी ने सांगितले की स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये असलेला समन्वयाचा अभाव आणि चुकीच्या पद्धतीने केलेले वितरण यामुळे ही घटना घडली. ईद-उल-फित्रच्या आधी ही दुर्घटना घडली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एका शाळेत मदत वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या घटनेनंतर बंडखोरांनी शाळेला सील ठोकले. तसेच पत्रकारांसह लोकांना येथे येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सशस्त्र हुथी बंडखोरांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवेत गोळीबार केला आणि विजेच्या तारेला धडकल्यानंतर त्याचा स्फोट झाला. यामुळे कार्यक्रमाला उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली आणि लोक पळू लागले. गृह मंत्रालयाने सांगितले की त्यांनी दोन आयोजकांना ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इराण समर्थित हाउती बंडखोरांनी येमेनची राजधानी साना 2014 मध्ये ताब्यात घेतली होती. त्यामुळे तेथील मान्यता प्राप्त सरकारला बेदखल व्हावे लागले.

या घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही मृत्यू झाला आहे. मात्र, अद्याप आकडेवारीचा तपशील जाहीर झालेला नाही.

हे ही वाचा :

Hybrid Solar Eclipse : पाहा शतकातील दुर्मिळ ‘हायब्रीड’ सूर्यग्रहण; २०२३ मधील पहिलं  सूर्यग्रहण

हुश्श् ! येत्या काही दिवसांत उन्हाच्या काहिलीपासून होणार सुटका !!

Back to top button