पुढारी ऑनलाईन : दक्षिणेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू हिचा एक जुना व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमधील रॅपिड फायर राऊंडचा हा भाग आहे. समांथाला सेक्सला प्राधान्य देशील का जेवणाला, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
या प्रश्नाने सुरुवातीला गोंधळेल्या समांथाने बेधडक उत्तर देत 'सेक्स' असे उत्तर दिले होते. "जेवणाशिवाय काय एक दिवस सहज राहू शकते," असे उत्तर समांथाने देत मुलाखत घेणाऱ्याचीच विकेट घेतली. या उत्तरानंतर सामंथा दिलखुलास हसली आहे. सामंथा बऱ्याचवेळा बोल्ड विधानं करते, त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती या विधानातून आली आहे.
जेएफडब्यू या मासिकाला ही मुलाखत तिने दिली होती. हा व्हिडिओ २०१७चा आहे. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्यात नुकताच घटस्फोट झालेला आहे. घटस्फोटानंतर समांथा पूर्णवेळ कामावर लक्ष देत आहे. सामंथा सध्या एका हॉलिवुड चित्रपटातही काम करत आहे. Arrangement of Love असे या चित्रपटाचे नाव आहे. तसेच तामीळ आणि तेलुग अशा दोन्ही भाषांत येणाऱ्या आणखी दोन चित्रपटांत ती झळकणार आहे.