amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर ‘यामुळे’ केबीसी होस्‍ट करायची वेळ आली, भावूक हाेत म्‍हणाले… | पुढारी

amitabh bachchan : अमिताभ बच्चन यांच्यावर 'यामुळे' केबीसी होस्‍ट करायची वेळ आली, भावूक हाेत म्‍हणाले...

मुंबई ; पुढारी ऑनलाईन डेस्‍क

‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 13) च्या १००० व्या भागाचे नुकतेच प्रक्षेपण करण्यात आले. या दरम्‍यान अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे भावुक झाले. ‘कौन बनेगा करोडपती’ हा टीव्ही च्या छोट्या पडद्यावर २००० मध्ये सुरू झाला होता. गेल्‍या २१ वर्षापासून अमिताभ बच्चन हे या शोशी जोडले गेलेले आहेत. (KBC) चा अमिताभ यांच्या जीवनात महत्त्‍वपूणर्ण भूमिका आहे. या शो ने अमिताभ (Amitabh Bachchan) यांना संकट काळातून बाहेर पडण्यासाठी मदत केली होती. ते जेंव्हा खूप हताश झाले होते. कर्जाच्या डोंगराखाली दबले होते तेंव्हा केबीसीनेच त्‍यांना यातून बाहेर काढले.

शुक्रवार दि ३ डिसेंबर रोजी ‘शानदार शुक्रवार’ (KBC 13 Shaandaar Shukravaar) स्‍पेशल भागाचे प्रक्षेपण करण्यात आले. १ हजार भाग पूर्ण करण्याच्या निमित्‍ताने शो च्या निर्मात्‍यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुलगी श्वेता नंदा (Shweta Bachchan Nanda) आणि त्‍यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) यांना शोमध्ये बोलवले होते. या वेळी पत्‍नी जया बच्चन (Jaya Bachchan) या व्हिडिओ कॉलव्दारे या शो मध्ये सहभागी झाल्‍या हाेत्‍या.

श्वेता आणि नव्याने अनेक गोष्‍टी उघड केल्‍या

शो दरम्यान श्वेता आणि नव्याने अमिताभ यांच्‍याबाबत अनेक मजेदार गोष्टी सांगितल्या. तर जया बच्चन यांनी त्‍यांच्या फॅशन विषयीचे किस्‍से सांगितले.दरम्‍यान शो मध्ये भावूक क्षण तेंव्हा आला जेंव्हा मुलगी श्वेताने अमिताभ यांना हा शोचा १००० वा भाग आहे. या प्रसंगी तुम्‍हाला काय वाटत आहे. असा प्रश्न विचारला.

‘केबीसी’ करण्याची गरज; कारण सांगून भावूक…

या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ यांनी म्‍हणाले की, खरं तर २१ वर्षं झाली. सन 2000 मध्ये याची सुरुवात झाली.  आम्हाला त्यावेळी माहित नव्हते. तुम्ही चित्रपटातून टीव्हीच्या छोट्या पडद्याकडे जात आहात, असे सगळे म्हणत होते. यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. पण अशी काही परिस्थिती होती की मला असे वाटायचे की माझ्याकडे जे काम आहे, ते मला चित्रपटात मिळत नाही; पण पहिल्या प्रक्षेपणानंतर ज्या पद्धतीने प्रतिक्रिया येऊ लागल्या, त्यानंतर सारे जगच बदलले, असे वाटू लागले.

सेटवर शांतता पसरली…

अमिताभ पुढे म्हणाले, ‘सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आमचे जेवढेही स्पर्धक आले. प्रत्येक स्पर्धकांकडून मला दररोज काहीतरी शिकायला मिळाले. यानंतर ‘कौन बनेगा करोडपती’ आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रवासाचा व्हिडिओ दाखवण्यात आला. 3 जुलै 2000 पासून आतापर्यंतचा प्रवास पाहून अमिताभ यांना अश्रु अनावर झाले. यावेळी सेटवर शांतता पसरली. सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

जेव्हा अमिताभ कर्जबाजारी झाले; केबीसीने दिली उभारी…

अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या अमिताभ बच्चन यांच्या दशकभराच्या कारकिर्दीत एक काळ असा होता, जेंव्हा ते कर्जात बुडालेले होते. त्‍यांनी स्‍वत:ची ABCL कंपनी सुरू केली होती. मात्र काही काळानंतर या कंपनीची परिस्‍थिती खराब झाली.त्‍यामुळे त्‍यांना ही कंपनी बंद करावी लागली. यामुळे अमिताभ बच्चन मोठ्या कर्जात बुडाले. कर्जाची रक्‍कम मागण्यासाठी लोक घरी येउ लागले. असही म्‍हटलं जात की, अमिताभ यांनी आपले घर ही गहाण ठेवले होते.

अमिताभ यांना 15 कोटींची फी

या कठीण काळात यश चोप्रांनी अमिताभ (Amitabh Bachchan) यांना मदत केली. त्‍यांना ‘मोहब्बतें’ चित्रपट दिला. त्याचवेळी त्यांना 2000 मध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करण्याची ऑफर मिळाली. पहिल्याच सीझनपासूनच केबीसीने रेटिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले, या शोला घरोघरी चांगलीच पसंती मिळाली. यासाठी अमिताभ यांना 15 कोटींची फी देण्यात आल्याचे सांगण्यात येते.या शोमधील कमाई आणि जाहिरातींमुळे अमिताभ यांनी त्यांचे 90 कोटींचे कर्ज फेडले, याचा खुलासाही त्यांनी एका मुलाखतीत केला हाेता.

हेही वाचलं का?

 

Back to top button