पुढारी ऑनलाईन डेस्क
काय काय अनी! म्हणत सई ताम्हणकरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. (sai tamhankar) सॅटीन व्हाईट सिल्व्हर वन पीस ड्रेसमध्य़े हॉट फोटोशूट केले आहे. त्यावर उत्तम हेअर स्टाईल आणि साजेशा मेकअपने तिने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. (sai tamhankar)
एका मागोमाग एक फोटो शेअर करत तिने सर्वांनाच धक्का दिला आहे. अस म्हणण्याचं कारण की, सई या फोटोशूटमध्ये स्लिम तर दिसतेच आहे, शिवाय ती खूप सुंदरही दिसतेय. तिचा हा लूक पाहून सर्वचजण भारावून गेले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. पहिला फोटो शेअर करत सईने लिहिलंय-Served !!, दुसरा फोटो शेअर करत तिने म्हटलंय-
काय काय अनी !. तिसरा फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिलीय की-Glam bam ! हे सर्व फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोंना लाईक्स तर मिळतच आहेत. शिवाय तिच्या फोटोंवर कमेंट्सची बरसात पाहायला मिळतेय. Ur my crush n allow be mam❤️❤️❤️❤️Dazzling Diva ?, Ufffffff♥️♥️♥️♥️♥️, Saie ma'am you look very beautiful and cute ❤️❤️❤️❤️❤️❤️, Such beautiful pictures ??❤️❤️❤️, Bright Pearl ? ? timeless wonder… beautiful ?, Beautiful close look, Queen?? यासारख्या कमेंट्स करत फॅन्सनी तिचे कौतुक केले आहे.
सई आणि ललित प्राकरचा आगामी चित्रपट पेटपुराण भेटीला येणार आहे. यात सईने आदितीची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर अतुलच्या भूमिकेत ललित प्रभाकर आहे. या कपलला मुले व कुटुंब नको आहे. पण, समाजात वावरताना त्यांना यावरूनच बरेच टोमणे आणि टीका सहन करावी लागते. परिपूर्ण कुटुंबाप्रती त्यांचा आगळावेगळा दृष्टीकोन आहे. असे कथानक या चित्रपटाभोवती फिरते.
चित्रपटाची निर्मिती व लेखन दिग्दर्शक ज्ञानेश जोटिंग यांनी केले आहे. हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ही एक सीरीज असल्याचं म्हटलं जात आहे.