KGF-२ : यशच्या चित्रपटाने रचला इतिहास, १ हजार कोटींचा जमवला गल्ला | पुढारी

KGF-२ : यशच्या चित्रपटाने रचला इतिहास, १ हजार कोटींचा जमवला गल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क

साऊथ सुपरस्टार यशचा चित्रपट केजीएफ (KGF-२) १४ एप्रिल २०२२ रोजी रिलीज झालाय.’केजीएफ: चॅप्टर २’ चा बॉक्स ऑफिसवर आजदेखील दबदबा कायम आहे. या चित्रपटाचा अभिनेता यशच्‍या स्‍टाईलवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. त्याचबरोबर, यश स्टारर या चित्रपटाने १६ व्या दिवशीदेखील चांगलाच गल्ला जमवत इतिहास रचला आहे. (KGF-२)

केजीएफने १६ दिवसांत आतापर्यंत वर्ल्डवाईड १००० कोटींचा बिझनेस केला आहे. दंगल, बाहुबली-२ आणि आरआरआरनंतर यश स्टारर हा चित्रपट हा माेठा बिझनेस करणारा चौथा चित्रपट आहे.

शुक्रवारची कमाई पाहिली तर हिंदी भाषेतील चित्रपटाती जवळपाm ४.२५ कोटी रुपयांचा बिझनेस केलाय. त्यामुळे आतापर्यंतचा एकूण आकडा ३५३.०६ कोटी पार झाला. ओपनिंग डेला या चित्रपटाने १३४ कोटी ५० लाख रुपयांचा बिझनेस केला होता.

एप्रिलमध्ये दोन धमाकेदार चित्रपट चित्रपटगृहात दाखल झाले. यात अजय देवगनचा ‘रनवे ३४’ आणि ॲक्शन हिरो टायगर श्रॉफ – तारा सुतारियाचा ‘हीरोपंती-२’ चा समावेश आहे. दोन्हीही चित्रपट पहिल्या दिवशी काही खास कमाल दाखवू शकली नाही. ‘हीरोपंती-२’ ने जवळपास ७ कोटींचा बिझनेस केला. तर ‘रनवे ३४’ ने ३ ते ३.२५ कोटींचं कलेक्शन केलं.

KGF-२ हा चित्रपट २०१८ मध्ये आलेला यशचा सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटामध्ये यश मुख्य भूमिकेत आहे. शिवाय, संजय दत्त, रवीना टंडन आणि श्रीनिधिसहित अनेक कलाकारदेखील प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी कन्नड, तेलुगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट प्रशांत नीलद्वारा दिग्दर्शित आहे.

हेही वाचा: 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash (@thenameisyash)

Back to top button