पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहित करणारी सई ताम्हणकरचा फिटनेस पाहून तुम्हालाही थक्क वाटेल. (sai tamhankar) सईने खूप कष्ट घेऊन आपला फिटनेस ठेवला आहे. तिने आपल्या अभिनयातून आपली अदा दाखवल्या आहेत. आताही तिने फोटोशूटच्या माध्यमातून अदा दाखवल्या आहेत. तिच्या या फोटोशूटमध्ये एक खास बाब आहे. ती नक्की काय आहे, पाहुया पुढे. (sai tamhankar)
सई सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करत आहे. तिच्यासोबत अभिनेता प्रसाद ओकदेखील आहे. सईची फॅशन नेहमीच चर्चेत असते. तिच्या फॅशनमध्ये नेहमी काही ना काही नाविन्यता असते. सईचे फोटो आतादेखील चर्चेत आहेत. पाहुया तिच्या नव्या लूकमध्ये काय आहे.
सई ताम्हणकरने आपले फोटोशूट इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती घागरा चोलीमध्ये दिसते. बनारसी लाल रंगाचा घागरा आणि पिवळ्या रंगाच्या ब्लाऊजवर बनारसी दुपट्टा तिने परिधान केलेला आहे. त्यावर गळ्यात दागिना आणि गोल्डन झुमके घातले आहेत एका हातात गोल्डन रंगाच्या बांगड्या तिने घातल्या आहेत.
कपाळावर बिंदी आणि केसांमध्ये गुलाबाची फुले माळत तिने सुंदर अशी हेअर स्टाईल केली आहे. घागरा चोलीमध्ये तिची डीप बॅक चोली लक्ष वेधून घेते. तिने या फोटोंसोबत ? दिवा इमोजी शेअर केला आहे. तिचा हा दिवाळीचा खास लूक सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.