व्हिडिओ : तक्रारदार महिलेला कर्नाटकच्या मंत्र्याने लगावली कानशिलात, तिने धरले मंत्र्याचे पाय | पुढारी

व्हिडिओ : तक्रारदार महिलेला कर्नाटकच्या मंत्र्याने लगावली कानशिलात, तिने धरले मंत्र्याचे पाय

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील एका मत्र्याने तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेला कानशिलात लगावलेला प्रसंग कॅमेरात कैद झाला आहे. हा प्रकार कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील हंगला गावात एका सरकारी कार्यक्रमादरम्यान घडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेवर अनेक नेटकऱ्यांकडून संताप देखील व्यक्त केला जात आहे.

गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री व्ही. सोमण्णा हे शनिवारी (दि.) ग्रामस्थांना जमीन हक्कपत्र वाटपाच्या कार्यक्रमात हजर झाले होते. यादरम्यान त्यांनी अडीचशे नागरिकांना जमीन हक्कपत्राचे वाटप केले. कार्यक्रमात सुरू असताना अचानक एक महिला आपल्याला हक्कपत्र न मिळाल्याची तक्रार घेऊन समोर आली. तिने आपलेला हे हक्कपत्र मिळाले नसल्याची तक्रार करत, ती प्रचंड संतापली.

तिने अधिकाऱ्यांशी हुज्जत घालायला सुरूवात केली. त्यानंतर ती मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यापर्यंत पोहचताच, या महिलेच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या मंत्रीमहोदयांनी थेट तिच्या कानशिलातच लगावली. तरीदेखील या महिने आपल्या मागणीसाठी मंत्र्याचे पाय धरल्याचे या व्हिडीओमधून स्पष्ट दिसून येत आहे. परंतू, मंत्रीमहोदयांनी त्यांची चूक लक्षात येताच, या महिलेची माफी मागितल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा:

Back to top button