बिग बॉस मराठी-4 day 21 : मला तुझा राग कळतोय– अपूर्वा | पुढारी

बिग बॉस मराठी-4 day 21 : मला तुझा राग कळतोय– अपूर्वा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पार पडले. “नॉमिनेशन रॉकेट” हे नॉमिनेशन कार्य. नॉमिनेशन कार्याअंती या आठवड्यातील घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये किरण, अमृता देशमुख, त्रिशूल, विकास, योगेश आणि प्रसाद हे सदस्य नॉमिनेट झाले. आता या आठवड्यात कोणत्या सदस्याला घराबाहेर पडावे लागेल, कोणाचा प्रवास संपणार हे या रविवारी कळेलच. नॉमिनेशनमध्ये आल्याने विकास जरा नाराज आहे आणि त्याच संदर्भात आज अपूर्वा त्याच्याशी संवाद साधताना दिसणार आहे.

अपूर्वा विकासची समजूत काढणार असून त्याला सांगणार आहे, मला तुझा राग कळतो आहे सगळ्यांनी मिळून तुला नॉमिनेट केले आहे. तुला कुठेतरी तो inferiority कॉम्प्लेक्स आहे असं मला जाणवतं आहे. तुला असं वाटतं आहे फक्त दाद्या तुला समजून घेतो. काय होतं ना तू जरी शंभर टक्के बरोबर असला तरी पण दिसताना असं दिसत आहे की, त्यांच्या मेंदूने तू गेम खेळतो आहेस. जेव्हा कि असं नाहीये आणि म्हणून तुझी चिडचिड होते आहे. कारण तुझी निर्णयक्षमता मी बघितली आहे म्हणून आज मी तुला नॉमिनेट नाही केलं. कारण जिथे दादा नाहीये तिथे मी तुला तुझे निर्णय घेताना आणि खेळ खेळताना पहिले आहे. आज बघूया यांच्यात अजून काय चर्चा होते ते. अपूर्वाचं म्हणणं विकासला कळतं का?

Back to top button