Sai Resort 
Latest

Sai Resort : मंत्री परबांचे रिसॉर्ट तोडण्यासाठी आज सोमय्या येणार दापोलीत!

सोनाली जाधव

दापोली पुढारी वृत्तसेवा :  दापोली मुरुड समुद्रकिनारी बांधण्यात आलेले साई रिसॉर्ट (Sai Resort)   मंत्री अनिल परब यांच्या मालकीचे आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेकदा केला आहे. मात्र आज ( दि. २६) सोमय्या हे दापोली मुरुड येथे मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट तोडण्यासाठी येत असून, सोमय्या यांना रोखण्यासाठी येथील पर्यटन व्यवसायिकदेखील आक्रमक झाले आहेत.  राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार संजय कदम यांनीही किरीट सोमय्या यांना कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे दापोलीतील राजकीय वातावरण तापले आहे.

Sai Resort :  दापोलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली येथील साई रिसॉर्ट ताेडणार, असा दावा केला आहे. हे रिसॉर्ट तोडण्याबाबतचा आदेश निघाले आहेत, असे देखील सोमय्या अनेकदा ट्विटच्‍या माध्‍यमातून स्‍पष्‍ट केले आहे. मात्र आजपर्यंत साई रिसॉर्टची एक वीट हलली नाही. त्यामुळे स्वतः साई रिसॉर्ट तोडण्यासाठी दापोलीत येत आहोत, असा ट्विट देखील सोमय्या यांनी २४ मार्च राेजी केले होते. २६ रोजी सायंकाळी पाच वाजता सोमय्या हे दापोली पोलीस स्थानक येथे भेट देऊन ५ वाजता ते मुरुड येथे रवाना होणार असल्याचे येथील भाजप कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे दापोलीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

पर्यटन व्यवसायावर  परिणाम

मुरुड येथील सततच्या कारवाईने पर्यटन व्यवसायावर देखील परिणाम होऊ लागला आहे. पर्यटकांची संख्या देखील कमी होऊ लागली आहे. पर्यटन व्यवसायाचा ऐन हंगाम असूनही येथील कारवाईच्या भीतीने पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायिक आक्रमक झाले आहेत. मुरुड येथील पर्यटन क्षेत्रात जो राजकीय खेळ सुरू आहे तो थांबवा, असे आवाहन पर्यटन व्‍यावसायिकांनी केले आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT