Bharat Jodo Yatra  
Latest

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेतील वडिलांचा फोटो शेअर करत रितेश भावूक; लोक विचारत आहेत तू….

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) महाराष्ट्रातील आजचा सातवा दिवस आहे. या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Vilasrao Deshmukh) आपल्या ट्विटर अकाउंटवर काल (दि.१२) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये काही लोकांच्या हातात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचा फोटो दिसत आहे. हा फोटो आहे तो भारत जोडो यात्रेतील आहे. रितेशने हा फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्या या ट्विटवर नेटिझन संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. वाचा सविस्तर बातमी. 

Bharat Jodo Yatra : वडिलांचा फोटो शेअर करत रितेश भावूक

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारा अभिनेता आहे. तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो. कुटुंबवत्सल असणारा रितेश आपल्या कुटुंबातील काही क्षण, फोटोही शेअर करत असतो. रितेशचे वडील म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन होऊन भले बरीच वर्ष झाले असले तरी तो आजही तितकच त्यांना  मिस करत असतो. त्याने काल (दि.१२) आपल्या ट्विटरवर आपल्या वडिलांचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो आहे तो महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेतील. भारत जोडो यात्रेतील काही सहभागी लोकांनी विलासराव देशमुखांचा फोटो हातात घेतला आहे. हा फोटो त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. त्याने शेअर केलेला फोटो ट्विट त्याची पत्नी जेनेलिया डिसुझाने (Genelia D'Souza) आपल्या ट्विटर अकाउंटर रिट्विट केला आहे. 

तू का सहभागी झाला नाहीस 

रितेश देशमुखने भारत जोडो यात्रेतील एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोंमध्ये त्याचे वडील म्हणजे विलासराव देशमुख यांचा फोटो हातात घेतलेला आहे. हा फोटो जेव्हा त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला तेव्हा त्या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. एक ट्विटर युझर म्हणत आहे, "तुम्ही ऐतिहासिक अशा भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाही का? " तर एकजण म्हणतं आहे की, "या फोटोत तुम्ही कुठाय", तर काहीजण विलासराव देशमुखांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

Bharat Jodo Yatra

भारत जोडो यात्रेतील आणखी एक फोटो  व्हायरल होत आहे. भारत जोडो यात्रेतील एका सहभागीच्या हातात विलासरावांचा फोटो दिसत आहे. तर त्याच्या सोबत राहुल गांधी आणि कॉंग्रेस प्रदेशाद्धक्ष नाना पटोलेही दिसून येत आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT